Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवा, साधनेची नाव तूच ने पैलतिरी ।

    ‘१९.१०.२०१६ या दिवशीच्या भावसत्संगानंतर कर्तेपणाची व्याप्ती काढतांना मला माझ्यातील कर्तेपणासंबंधी ६० सूत्रे लक्षात आली. त्यानंतर ‘कर्तेपणा दूर करणे माझ्यासाठी अशक्य आहे’, असे वाटून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण गेले. त्या वेळी मला खालील कविता सुचली. 
देवा, तू माय, तूच हो बाप ।
तूच माझा हो सखा ॥
सतत ऐकतोस, सहज बोलतोस ।
येतोस सतत धावून ॥ १ ॥

आहे स्वभावदोष नि अहं यांचे ओझे ।
कसे येऊ तुझ्याकडे गतीने ॥
कर्तेपणाने बांधले गेले माझे पाय ।
स्वभावदोषांचा असे अंधार ॥ २ ॥
मध्येच तुझा हात सोडता । 
अंधारामुळे तू दिसेना, भासे मज मीच हो एकटी ॥
एवढा हा त्रास, होतो मन:स्ताप । 
तरी मन वैरी हे, करत नाही तुझा धावा ॥ ३ ॥

सोडव रे देवा या स्थितीतून ।
चुकते मी सदैव, होतात माझ्याकडून पापे ।
तुझ्याशिवाय मला वाली ना कोणी । 
धाव रे धाव बाप तू माझा, वाचव या जिवाला ॥ ४ ॥

देहरूपी जिवाचा सारथी होऊन ने मज पैलतिरी ।
शरण तुला भगवंता मी आले ।
दे भीक शरणागतीची, दे हात रे तुझा । 
अन् शिकव कृतज्ञता, शिकव कृतज्ञता ॥ ५ ॥’

- सौ. सुप्रिया पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn