Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु धर्माचा सखोल अभ्यास करण्याची तळमळ असणार्‍या आणि नामजप करून त्याचा लाभ अनुभवणार्‍या बेंगळुरू येथील शिल्पा माधुरी जी !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या
शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती
सौ. शिल्पा माधुरी जी
   १० ते १४ डिसेंबर २०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती पुढे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. आरंभीची साधना - ध्यानधारणा आणि ग्रंथवाचन : ‘सौ. शिल्पा माधुरी जी. यांनी वयाच्या १५व्या वर्षी साधनेला प्रारंभ केला. सुरुवातीला त्या त्यांच्या वडिलांकडून मिळालेले ओशो यांचे ग्रंथ वाचत होत्या. त्यांच्या एका मैत्रिणीचे कुटुंब ध्यानधारणा करत असे, म्हणून त्यांनीही ध्यानसाधना करण्यास प्रारंभ केला. पुढे आध्यात्मिक साहित्याबद्दल जिज्ञासा वाढल्याने त्या अनेक ग्रंथ वाचू लागल्या; मात्र आळस आणि मायेत गुरफटल्यामुळे त्यांची साधना व्यवस्थित होत नव्हती. जिज्ञासेपोटी त्या परग्रहांवरील जिवांबद्दल संशोधन करत होत्या. १ आ. त्रास होत असतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप केल्याने लाभ होणे : विवाहानंतर त्यांची साधना खुंटली आणि त्यांना पुष्कळ त्रास जाणवू लागला. त्या अधूनमधून निराशेत जाऊ लागल्या; मात्र त्याचे मूळ कारण त्यांना समजत नव्हते. अनेकदा सकारात्मक गोष्टींबद्दलही इतर त्यांना नकारात्मक सांगत. यात पालट करण्यासाठी त्यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कार्यशाळेसाठी नाव नोंदवले. त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरून प्रश्‍न विचारले. त्यांना नामजप करणे आणि मिठाच्या पाण्याचे उपाय करणे, हे उपाय करण्यास सांगण्यात आले. त्रास होत असतांना त्या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करू लागल्या. त्यांनी नामजपाचा लाभही अनुभवला.
१ इ. हिंदु धर्माचा सखोल अभ्यास करण्याची आणि साधना करण्याची तळमळ असणे : सौ. शिल्पा यांना शिस्तबद्ध जीवन जगायचे आहे. त्यांना हिंदु धर्माचा (वेद, अन्य धर्मग्रंथ आणि धार्मिक विधी) सखोल अभ्यास करायचा आहे, तसेच विविध विधींमागील शास्त्र समजून घ्यायचे आहे. त्यांना साधना करण्याची तळमळ आहे. कार्यशाळेसाठी आल्यावर लगेच त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या स्काईप सत्संगांत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना सेवा करण्याचीही इच्छा आहे.’
- सौ. श्‍वेता क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय
२. आश्रमातील वास्तव्यात सौ. शिल्पा माधुरी जी. यांना आलेल्या अनुभूती
२ अ. आश्रमात २४ घंटे मोठ्या प्रमाणात ऊर्जा अनुभवणे : ‘आश्रमातील कलामंदिर आणि ध्यानमंदिर येथे मला मोठ्या प्रमाणात ऊर्जा जाणवली. पूर्वी अन्य एका संतांचे प्रवचन ऐकतांनाही मी हीच ऊर्जा १ घंटा अनुभवली होती; मात्र आश्रमात मी ही ऊर्जा २४ घंटे अनुभवत आहे.
२ आ. आश्रमात आल्यानंतर एकलकोंडेपणा जाऊन मन मोकळे होणे आणि प्रथमच इतरांत मिसळावेसे वाटणे : आश्रमात येण्यापूर्वी मी एकलकोंडी होते. येथे आल्यावर माझे मन मोकळे होत असल्याचे जाणवत आहे. येथे सर्वजण त्यांचे अनुभव मोकळेपणाने मांडत असल्याने मला ते जमू लागले. मला अन्य शिबिरार्थींसह संपर्क पत्ते, इ-मेल आणि व्हॉट्स अ‍ॅप यांचे आदान-प्रदान करावेसे वाटले. असे मला प्रथमच वाटले आहे.
२ इ. एकट्याने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे अवघड वाटणे अन् स्वप्नात ‘स्वभावदोष आणि अहं यांची सारिणी लिखाण करून ते आश्रमात द्यायचे आहे’, असे बोलल्याचे सहशिबिरार्थीने सांगणे : एका सत्रानंतर मला एकट्याने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणेे अवघड वाटले; कारण मला स्वतःचे सतत निरीक्षण करावे लागले असते आणि प्रत्येक क्षणी सतर्क रहावे लागले असते. माझे मन मला सांगत होते, ‘तुला स्वभावदोष-अहं निर्मूलन प्रक्रिया करणे शक्य नाही. कदाचित कधी-कधी तुला नामजप करणे जमू शकेल.’ एका सहशिबिरार्थीने मला सांगितले की, मी स्वप्नात बोलत होते, ‘स्वभावदोष आणि अहं यांची सारिणी लिखाण करून ते आश्रमात द्यायचे आहे.’
- सौ. शिल्पा माधुरी जी., बेंगळुरू, कर्नाटक, भारत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn