Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ध्यानमंदिरात प्रवेश करण्यापूर्वी 
    जेव्हा मी ‘डोळे मिटून काय जाणवते ?’, असे पाहिले, तेव्हा आजूबाजूला किंवा भोजनगृहात येणार्‍या आवाजाकडे माझे लक्ष जात होते. 
२. ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर
अ. ध्यानमंदिरात प्रवेश करतांना वृत्ती अंतर्मुख होऊ लागली. 
आ. ‘आपण एका पोकळीत आहोत आणि काळ पूर्णपणे थांबला आहे’, असे वाटले. 
इ. माझे मन लगेच एकाग्र होऊन शांत वाटू लागले. 
ई. माझे आजूबाजूच्या सगळ्या स्थितीचे भान नष्ट होऊन ध्यानमंदिरात येणार्‍या सूक्ष्म नादावर लक्ष एकाग्र झाले. 
उ. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘याला ध्यानमंदिर का म्हणतात, तर इथे ध्यान लगेचच लागते, त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.’
३. ध्यानमंदिरातील मूर्ती, तसेच देवता आणि संत 
यांच्या तसबिरी यांच्याकडे पाहिल्यावर आलेल्या अनुभूती 
३ अ. श्री भवानीदेवीची मूर्ती : या मूर्तीकडे पाहून काही सेकंद डोळे मिटले. तेव्हा मला देवीचे मारक तत्त्व जाणवले आणि स्वतःवर पुष्कळ मोठ्या प्रमाणात उपाय होऊ लागले. 
३ आ. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे छायाचित्र : या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘यात श्री भवानीदेवीच्या मूर्तीपेक्षा अधिक मारक तत्त्व आहे’ आणि ‘देवी युद्धावर निघालेली आहे’, असे जाणवले.
    वरील दोन्ही देवतांकडे पाहिल्यावर मला ‘पुष्कळच मोठ्या प्रमाणात शरिरांतर्गत आणि बाहेरील काळ्या शक्तीचे आवरण अल्प होत आहे’, असे जाणवले.
३ इ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आशीर्वाद म्हणून दिलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती 
१. या मूर्तीकडे पाहिल्यावर भाव जागृत होतो आणि पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवतो.
२. देवीच्या हातातील तलवार हलतांना दिसली.
३ ई. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे सजीव झालेले छायाचित्र 
१. यात सजीवत्व असल्याचे जाणवते. ही छायाचित्राची तसबीर असल्याची संकल्पनाच मनातून निघून जाते. 
२. छायाचित्र पहातांना प्रत्यक्ष माणसाची मान जशी वळते, तशी प.पू. बाबांची चेहर्‍यासह मान आपल्या दिशेने वळल्यासारखी दिसते. 
३. बाबांचे डोळे आणि ओठ फार सजीव वाटतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायचीच इच्छा होते. 
४. प.पू. बाबा आपल्याकडे बघून स्मितहास्य करत असल्याचे जाणवते. 
२ उ. पंचमुखी हनुमानाची मूर्ती : पंचमुखी हनुमानाने हाताने पर्वत उचलला आहे. तो हात पर्वतासह वर-खाली हलत असल्यासारखे वाटते.
४. संपूर्ण आश्रमाचे वैशिष्ट्य 
     ज्याप्रमाणे आध्यात्मिक उपायांच्या खोलीत बसल्यावर आपल्यावर उपाय होतात, त्याप्रमाणे रामनाथी आश्रमात कुठेही असतांना उपाय होतात आणि ‘मन एकाग्र होते. त्यासाठी कुठेही प्रयत्न करावे लागत नाहीत.’
     (वरील वाक्य वाचल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या एका साधकाला सांगितलेले पुढील वाक्य मला आठवले. ते म्हणाले होते, ‘‘तू दिवसभर ध्यानमंदिरात किंवा निर्गुण उपायांच्या खोलीत नामजपाला बस. एकवेळ तुझा नामजप झाला नाही, तरी तेथे तुझ्यावर उपाय होतील. त्यातूनही तुला तेथे जाता आले नाही आणि तू आश्रमात कुठेही असलास, तरी तुझ्यावर उपाय होतील !’’ - श्री. गिरिधर वझे, सनातन आश्रम, गोवा.)
- (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn