Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह भ्रष्ट सनदी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा ! - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा आरोप

भूमी लाटण्याच्या प्रकरणाच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिवसेनेचे आंदोलन !
     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई-नागपूर समृद्धी या मुख्य मार्गावर राज्यातील मोठ्या अधिकार्‍यांनी ठाणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गरीब शेतकर्‍यांच्या भूमी खरेदी केल्या आहेत. या भूमी लाटणार्‍या भ्रष्ट सनदी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर या दिवशी केली. या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी याच सूत्रावर सभागृहाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलेे. या अधिकार्‍यांच्या भूमी खरेदीचा सातबारा उतारा श्री. सरनाईक यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेतील सभागृहात दाखवला होता.      मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांचाही भूमी खरेदीच्या आरोपात समावेश आहे. सर्वच अधिकार्‍यांनी जवळपास १ सहस्र एकर भूमी स्वतःचे भाऊ-बहीण आणि मेहुणे यांच्या नावावर खरेदी केल्याचे उघड झाले आहे. केंद्र शासनाने राज्याच्या सहकार्याने मुंबई-नागपूर मुख्य मार्ग बांधायला प्रारंभ केला आहे, तर मुख्य मार्गाची ही समृद्धी बघून अधिकार्‍यांनी अगोदरच त्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतला आहे, असा आरोपही शिवसेनेच्या नेत्यांनी केला.
नातेवाइकांच्या नावे भूमी खरेदी केल्याचा आरोप असणारे अधिकारी !
  • मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे मेहुणे यांच्या नावावर
  • माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांचा मुलगा पियुष याच्या नावावर
  • माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे यांचा मुलगा रवींद्र याच्या नावे
  • ठाणे प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांचा भाऊ सुभाष याच्या नावे
  • सुभाष हजारे यांचा भाऊ पुंडलिक आणि भावजयी यांच्या नावे
  • ठाणे अतिरिक्त आयुक्त मिलिंद चव्हाण यांच्या भावाच्या नावे
  • तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधव यांच्या भावांच्या नावे
  • वरीलपैकी बहुतांश अधिकार्‍यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळल्याचे वृत्त आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn