Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यार्ंच्या हत्यांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा करणार !

     बेंगळुरू - येथे १६ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आर्. रुद्रेश यांची काही धर्मांधांनी हत्या केली होती. या प्रकरणी ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली होती. या हत्येची चौकशी आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) करणार आहे. रुद्रेश यांच्या हत्येव्यतिरिक्त २२ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूतील कोइम्बतूर येथे हिंदू मुन्नानी संघटनेचे पदाधिकारी सी. शशिकुमार आणि १३ मार्च या दिवशी कर्नाटकातील मैसुरू येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते के. राजू यांच्या हत्येचीही चौकशी एन्.आय.ए. करणार आहे. 

     दक्षिण भारतात गेल्या काही आठवड्यांत अनेक हिंदु नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. या हत्या पूर्वनियोजन करून घडवून आणल्या होत्या काय, याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) करणार आहे. रुद्रेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद, इरफान पाशा आणि असीम पाशा या ५ धर्मांधांना अटक केली होती. त्यातील असीम पाशा हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या आतंकवादी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी भाजप आणि इतर हिंदु संघटनांनी केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn