Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तृप्ती देसाई यांनी शबरीमाला मंदिरात येऊनच दाखवावे ! - अय्यप्पा धर्म सेनेची चेतावणी

    थिरूवनंतपुरम् - अय्यप्पा धर्म सेनेचे अध्यक्ष श्री. राहुल ईश्‍वर यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई अथवा त्यांच्या पुरोगामी अनुयायांनी शबरीमाला मंदिरात येण्याचे धाडसच दाखवावे, अशी चेतावणी दिली आहे. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील गर्भगृहातील प्रवेशाच्या यशाला श्री. राहुल यांनी बनावट म्हटले आहे. 
    श्री. राहुल ईश्‍वर पुढे म्हणाले की, हाजी अली दर्गा आणि शबरीमाला मंदिराला घटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक अधिकार प्रदान केले आहेत. जर तृप्ती देसाई अथवा त्यांच्या पुरोगामी अनुयायांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. या तथाकथित पुरोगामी महिलांनी हाजी अली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशाच्या प्रश्‍नावर आंदोलन करण्यापेक्षा देशासमोर उभे असलेले अधिक ज्वलंत प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांनी त्यांचे लक्ष स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी इत्यादीवर केंद्रीत करावे. शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या भूमिकेवर अय्यप्पा धर्म सेना ठाम आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn