Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नामस्मरण भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यावर श्रीमती मेघना वाघमारे यांना आलेल्या अनुभूती !

श्रीमती मेघना वाघमारे
     भावजागृतीसाठी मनापासून प्रयत्न केले, तर भावजागृती किती लवकर होऊ शकते, याचे आदर्श उदाहरण श्रीमती मेघना वाघमारे यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. सत्संगात प्रतिदिन भावपूर्ण नामस्मरण करण्यास सांगितल्यावर 
प्रतिदिन अल्प काळच भावपूर्ण नामस्मरण होत आहे, असे लक्षात येणे
     १६.११.२०१६ या दिवशी मला संतांच्या सत्संगात उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. सत्संगात एका साधकाच्या मनातील शंकांचे निरसन करतांना संतांनी प्रतिदिन नियमित आणि भावपूर्ण नामस्मरण झालेच पाहिजे. नामाचे महत्त्व लक्षात घेऊन ते केलेच पाहिजे, असे सांगितले. त्या रात्री या सूत्रावर विचार करतांना मी नकळत स्वतःच्या आत डोकावून पाहिले. तेव्हा माझ्या मनात मी प्रतिदिन नामजप करते; परंतु माझे नामस्मरण भावपूर्ण होते का ? किती काळ भावपूर्ण नामस्मरण होते ?, असे प्रश्‍न निर्माण झाले. माझ्याकडून भावपूर्ण नामस्मरण अल्प काळच होत आहे, असे मला वाटले. नंतर गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे नामस्मरण तुम्हीच माझ्याकडून करवून घ्यावे, अशी प्रार्थना झाली.
२. नामस्मरण भावपूर्ण होण्यासाठी प्रार्थना केल्यावर जप 
करतांना गुरुस्मरण होणे, सूक्ष्मातून श्रीगुरूंचे दर्शन होणे, श्रीगुरूंचे 
चरण दिसणे आणि सभोवतालच्या वातावरणात त्यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे
      दुसर्‍या दिवसापासून मी नामस्मरण अधिक भावपूर्ण आणि अधिक काळ होण्यासाठी प्रार्थना करणे आणि अन्य प्रयत्न करण्यास आरंभ केला. तेव्हापासून जप करतांना गुरुस्मरण होणे, श्रीगुरूंचे दर्शन होणे, श्रीगुरूंचे चरण दिसणे, सभोवतालच्या वातावरणात त्यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे, अशा अनुभूती येऊ लागल्या. त्यामुळे भावस्थितीत अधिक काळ रहाता येते. मी एक-दीड घंटा बसून नामजप करतांना एकीकडे जप चालू असून दुसरीकडे प.पू. गुरुदेवांना आळवणे, त्यांच्याशी बोलणे, असेही होत असल्याचे अनुभवत आहे. 
३. नामजप आणि प्रार्थना करतांना स्वतःभोवती 
आणि खोलीत प्रकाश दिसणे आणि भावजागृती होणे
     २१.११.२०१६ या दिवसापासून नामजप आणि प्रार्थना करतांना माझ्या सभोेवती पिवळा किंवा निळा प्रकाश आहेे अन् खोलीत हा प्रकाश पसरला आहे, असे जाणवते. त्या दिवसापासून सेवा करतांना किंवा अन्यत्र कुठेही प्रार्थना करतांनाही असे जाणवत आहे. मी प्रार्थना करतांना मला मध्येच केव्हातरी खोलीला भिंती नसून सगळीकडे दूरपर्यंत नुसता प्रकाश पसरला आहे, असे जाणवते. हे अनुभवतांना भावजागृती होते आणि गुरुस्मरण अधिक होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटते. हे टंकलेखन करतांनाही भावजागृती होत होती. 
      हे काय आहे, ते माझ्या लक्षात येत नाही. हा भास आहे, माझ्या मनाचा खेळ आहे किंवा कसे ते कळत नाही, असा माझ्या मनात विचार आला. 
(उत्तर : नामजप भावपूर्ण होऊ लागल्यामुळे या अनुभूती येत आहे. - संकलक)
- श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn