Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हज यात्रेसाठी ८२६ कोटी रुपये देणारे आणि हिंदूंच्या तोंडाला पाने पुसणारे देशातील निधर्मी शासन ! - सौ. विद्या कदम, हिंदु जनजागृती समिती

डबेवाडी (जिल्हा 
सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा 

मार्गदर्शन करतांना सौ. विद्या कदम

       सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) - सध्या हिंदूंना धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी लढा द्यावा लागत आहे. शबरीमला मंदिर असो किंवा शनिशिंगणापूर मंदिर असो, तेथील मंदिरातील प्राचीन धर्मपरंपरा निधर्मी राज्यकर्ते मोडीत काढत आहेत. देशातील निधर्मी शासन हज यात्रेसाठी ८२६ कोटी रुपये देते; मात्र हिंदूंच्या तोंडाला पाने पुसते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विद्या कदम यांनी केले. डबेवाडी (जिल्हा सातारा) येथील श्रीपद्मावती माता मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर श्री. राहुल कोल्हापुरे उपस्थित होते.
       श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मसभेला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. समितीच्या कार्याची ओळख श्री. वैभव क्षीरसागर यांनी करून दिली. डबेवाडी आणि पंचक्रोशीतील १०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी सभेचा लाभ घेतला.
हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या कार्यात सक्रीय 
सहभाग घ्या ! - श्री. राहुल कोल्हापुरे, सनातन संस्था
       धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना हाच अन्याय व्यवस्थेला खरा पर्याय आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष विसरून केवळ हिंदु म्हणून संघटित व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यात सक्रीय सहभाग घ्यावा !
महत्त्वाचे - या सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी आयोजकांना विवादास्पद वक्तव्ये न करण्याविषयी सूचना केल्या होत्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn