Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या 
अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य
 लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता ः तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.
२. सध्याच्या काळात शब्दप्रमाण फारच थोडे लोक मानतात आणि बहुसंख्य त्यांना बुद्धीच्या स्तरावर का आणि कसे ? यांची उत्तरे मिळाली, तरच एखादे सूत्र मान्य करतात, उदा. गणपतीला जास्वंदीचे फूल का वाहायचे ?, यामागील अध्यात्मशास्त्र बुद्धीच्या स्तरावर सांगितल्यास त्यांना पटते. या दृष्टीकोनातून या ग्रंथांत अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात का आणि कसे ? यासंदर्भात माहिती दिली आहे.
३. अनेक सूक्ष्म गोष्टींमागील गहन अध्यात्मशास्त्र सांगणारे आणि आतापर्यंतच्या ग्रंथांत उपलब्ध नसलेले बरेच नवीन ज्ञान या ग्रंथांत दिले आहे. त्यामुळे भावी काळात धर्मशास्त्र सांगण्यासाठी धर्मग्रंथांप्रमाणे हे ग्रंथ उपयुक्त ठरणार आहेत.
४. धर्मग्रंथ संस्कृत भाषेत किंवा ज्ञानाच्या भाषेत असल्याने ते समजण्यास कठीण असतात. या दृष्टीकोनातून हे ग्रंथ सुगम (सोप्या) भाषेत आणि संस्कृत श्‍लोकांचा यथोचित संदर्भ देऊन संकलित केले आहेत.
५. या ग्रंथांद्वारे जिज्ञासूंच्या चित्तावर साधनेचा संस्कार होऊन ते साधनेला उद्युक्त होत आहेत. या ग्रंथांविषयी सहस्रो साधकांना आलेल्या अनुभूती, हे या ग्रंथांतील चैतन्य सिद्ध करणारे प्रमाणपत्रच आहे.
२. सनातनच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात साहाय्याची आवश्यकता !
     परात्परगुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांपैकी फक्त २९३ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती आतापर्यंत झाली असून अन्य सुमारे ४ सहस्र ५०० हून अधिक ग्रंंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथ-निर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता.
२ अ. मराठी भाषेतील ग्रंथांचे संकलन : ही सेवा करण्यासाठी मराठी भाषेचे साधारण ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे साधारण ज्ञान असल्यास मराठी भाषेतील व्याकरणाचे नियम आणि सनातनची ग्रंथसंकलनाची संगणकीय पद्धत शिकवणे सुलभ होईल.
     ग्रंथ-संकलनाची सेवा शिकण्यासाठी किंवा ही सेवा नीट करता येईपर्यंत तरी सनातनच्या आश्रमात रहाणे आवश्यक आहे. त्यानंतर घरी राहूनही ही सेवा करण्याचा प्रयत्न करता येईल.
२ आ. ग्रंथांची संगणकीय रचना : ही सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू शकणार्‍यांची आवश्यकता आहे. त्यांना पेजमेकर किंवा इन डिझाईन या संगणकीय प्रणालींचे साधारण ज्ञान असणे आवश्यक आहे.
२ इ. मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचा विविध भाषांत अनुवाद : ही सेवा करण्यासाठी विविध भाषांचे व्याकरणदृष्ट्या उचित ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्रंथ अन्य भाषांत अनुवाद करण्यासाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यांपैकी एका भाषेचे ज्ञानही आवश्यक आहे.
    या सर्व सेवा सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ किंवा घरी राहून प्रतिदिन काही घंटेही करता येतील.

ग्रंथ-निर्मितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी स्वतःची माहिती पाठवा !
    ग्रंथ-निर्मितीच्या कार्यात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी पुढील माहिती सौ. भक्ती खंडेपारकर (सनातन आश्रम, रामनाथी, गोवा - भ्रमणभाष क्र. ९४०४९५६०७४) यांना टपालाने किंवा granthgoa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.
अ. पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वय आणि शिक्षण
आ. घरी संगणक आहे का ?
इ. ई-मेलची व्यवस्था आहे का ?
ई. कोणती सेवा (उदा. मराठी संकलन, संगणकीय रचना, भाषांतर) करण्यास इच्छुक आहात ? या सेवेचा काही अनुभव आहे का ?
उ. भाषांतराची सेवा करणार असल्यास कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत अनुवाद करू शकणार, याचे विवरण लिहावे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn