Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्याला ‘गुन्हेगारी राज्य’ ठरवण्याचे पाप करू नका !

कायदा सुव्यवस्थेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर !
विधान परिषद 
     नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) - गुन्हेगारीची वर्गवारी लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते. ही वर्गवारी लक्षात घेता दिल्ली, केरळ, आसाम, हरियाणा, तेलंगणा आणि तामिळनाडू आदी राज्यांत महाराष्ट्रापेक्षा जास्त गुन्हे प्रविष्ट आहेत. त्यामुळे राज्याला ‘गुन्हेगारी राज्य’ ठरवण्याचे पाप करू नका, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. (असे असले तरी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होण्यासाठीचे प्रयत्न राज्य शासनाकडून अधिक गांभिर्याने व्हायला हवेत, हे कोणीही नाकारणार नाही ! - संपादक) अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावांतर्गत विरोधी पक्षांनी गृह खात्याच्या प्रकरणी चर्चा उपस्थित केली होती. त्या चर्चेला ते उत्तर देत होते. या वेळी विरोधकांना आश्‍वासन देतांना ते म्हणाले की, राज्यात सुरक्षेविषयीचे सर्वंकष धोरण आणि दृष्टीकोन सिद्ध करण्याविषयी राज्य सरकार विचार करेल. 
फडणवीस पुढे म्हणाले की, 
  • सध्या राज्यात १०० पैकी ५६ गुन्हेगारांना शिक्षा होत आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत ऑक्टोबर २०१६ पर्यंत ३ सहस्र ५४१ गुन्हे नोंद झाले असून त्या गुन्ह्यांमध्ये १०३ टक्क्याने घट झाली. 
  • महिलांवरील अत्याचाराचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी २७ विशेष न्यायालये, तर प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी २२ जलदगती न्यायालये स्थापन केली आहेत. राज्यात ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून त्याच्या तपासासाठी जिल्हास्तरावर ‘सायबर लॅब’ स्थापन केल्या आहेत. 
  • पोलीस आणि शासकीय चाकरमानी यांच्यावर आक्रमणे केल्यास त्या प्रकरणी ५ वर्षे शिक्षेची तरतूद करणार आहोत. तसेच ही आक्रमणे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.
  • पुण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘ई-तक्रार’ करण्याची व्यवस्था चालू करण्यात आली आहे. पुढील वर्षी राज्यात ‘ई-तक्रार’ लागू करण्यात येईल.
विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वरील सूत्रे मांडली.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn