Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रत्येक सेवा म्हणजे प.पू. गुरुदेवांची मानसपूजाच आहे, असे उत्तर देवाने सूक्ष्मातून देणे आणि तसेच मार्गदर्शन प.पू. पांडे महाराज यांनी स्थुलातून करणे

हे गुरुदेवा, 
आपल्या चरणी साष्टांग नमस्कार. 
१. नामजप करतांना प.पू. गुरुदेवांची मानस-पाद्यपूजा कशा प्रकारे करावी ? असा प्रश्‍न पडणेे आणि देवाने प्रत्येक सेवा ही प.पू. गुरुदेवांची मानसपूजा आहे, असा विचार सुचवणे : गुरुदेवा, मला चार घंटे नामजप करायला सांगितले आहेत. मी अगोदर ध्यानमंदिरात जाऊन नंंतर प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीभोवती प्रदक्षिणा घालतेेे. प.पू. गुरुदेवांची मानस-पाद्यपूजा आणि नामजप करतांना एकदा मनात विचार आला, आपण प्रतिदिन गुरुदेवांची मानस पाद्यपूजा पंचामृताने करतो; परंतु आज कशी पाद्यपूजा करावी ? आणि देवाने विचार दिला, भगवंताच्या अनेक प्रकारच्या सेवा असून प्रत्येक सेवा ही एक प्रकारे प.पू. गुरुदेवांची केलेली मानसपूजाच आहे.
२. प.पू. पांडे महाराज यांनी सेवेविषयी सांगितलेले एक सूत्र कळल्यावर संतांचे विचार सूक्ष्म रूपात स्वतःपर्यंत पोचल्याने मनापासून कृतज्ञता व्यक्त होणे : नंतर मी सेवा करतांना कु. सविताताई म्हणाली, आज प.पू. गुरुदेव आपल्यासमवेत असून ते आपल्याकडे पहात आहेत, असा भाव ठेवून सेवा करूया. त्यांना प्रार्थना करूया, तुम्हाला अपेक्षित अशी सेवा तुम्हीच आमच्याकडून करून घ्या. तेव्हा मी भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करून सेवा पूर्ण केली. नंतर एका साधिकेने संतसेवेमध्ये काय शिकायला मिळाले, हे सांगितले. ती म्हणाली, आज प.पू. पांडे महाराज यांनी सांगितले, आपण जी सेवा करतो, ती गुरुदेव श्रीजयंत बाळाजी आठवले यांच्या चरणांची पूजाच आहे. आपण पूजा शांतपणे आणि मनापासून करतो. तशाच प्रकारे सेवा केली, तरच त्या सेवेचा आनंद मिळू शकतो. हे ऐकून आज संतांचे विचार सूक्ष्म रूपात आपल्यापर्यंत पोचले, हे लक्षात येऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त झाली. 
      हे भगवंता, आमची अशीच अवस्था सतत राहून आमच्याकडून भावभक्ती आणि मधुराभक्ती करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे गुरुदेवा, आपल्या चरणी कृतज्ञ आहेे. 
- श्रीमती नागपाल, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn