Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समित्या स्थापन करून उपयोग नाही, उदासीनता सोडून मंत्र्यांनी लक्ष दिल्यास प्रश्‍न सुटेल !

कुपोषणाच्या प्रश्‍नाविषयी न्यायालयाने राज्यशासनाला फटकारले !
सर्वाधिक सत्ता भोगूनही काँग्रेसने न सोडवलेला कुपोषणाचा
प्रश्‍न सोडून युती शासनाने जनतेला चांगले दिवस दाखवावेत !
     मुंबई - मेळघाटासह राज्यातील आदिवासी भागांतील कुषोषण बळी रोखण्यासाठी केवळ समित्या नियुक्त करून उपयोग नाही. या गंभीर समस्येविषयीची उदासीनता सोडून आदिवासी कल्याण मंत्र्यांनी जातीने लक्ष घातले, तरच हा प्रश्‍न मार्गी लागू शकेल, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने ५ डिसेंबर या दिवशी दिला आहे. न्यायमूर्ती व्ही.एम्. कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. मेळघाट, पालघर या भागांत कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंविषयी विविध जनहित याचिका न्यायालयात करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर न्यायालयाने आतापर्यंत बरेच आदेश दिले आहेत; मात्र बळी आटोक्यात आणण्यात शासनाला यश आलेले नाही. त्यामुळे मंत्र्यांनीच या प्रश्‍नाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
      न्यायालयाने या प्रश्‍नाविषयी नेमलेल्या समितीच्या वर्षभरात ८ बैठका झाल्या; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता आम्ही आणखी समिती नेमण्याविषयी आदेश देऊ इच्छित नाही. त्यापेक्षा या प्रश्‍नाशी संबंधित खात्याच्या प्रधान सचिवांनी परस्परांशी समन्वय करावा आणि योजना कार्यान्वित कराव्यात. त्यासाठी २७ जानेवारीपर्यंत संबंधित सर्व खात्यांच्या प्रधान सचिवांनी बैठक घेऊन या प्रश्‍नाविषयी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्या उपायांची माहिती पुढच्या सुनावणीला देण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले. या वेळी हंगामी अधिवक्ता रोहित देव यांनी कुपोषण बळी रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपायांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. प्रतिज्ञापत्र पाहून न्यायालयाने ‘प्रतिज्ञापत्रातील उपायांची खर्‍याअर्थी कार्यवाही झाली, तर हा प्रश्‍न नक्कीच सुटेल’, असे मत व्यक्त केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn