Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फलटण (जिल्हा सातारा) येथे पोलिसांचे ३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन !

३१ डिसेंबरच्या दिवशी आणि रात्री होणारे अपप्रकार 
रोखण्याच्या संदर्भात महाराष्ट्रात विविध ठिकाणी निवेदने !
     फलटण (जिल्हा सातारा) - ३१ डिसेंबर या दिवशी ख्रिस्ती वर्ष साजरे करतांना होणारे अपप्रकार रोखा, या आशयाचे निवेदन फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास दिले. हे निवेदन तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे यांनी, तर फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश धस यांनी स्वीकारले.
     या वेळी तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे म्हणाले, ‘‘असे प्रकार कोठे घडतात, अशी ठिकाणे निवेदनात नमूद करा; म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला कारवाई करणे सोपे पडेल.’’ (सर्वांनीच याकडे सतर्कतेने पाहिल्यास हे अपप्रकार सर्वांच्याच लक्षात येऊ शकतात ! - संपादक) त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी हे अपप्रकार होणारी ठिकाणे सांगितली; तसेच पोलीस निरीक्षक श्री. धस यांनीही ‘असे प्रकार कोठे कोठे घडतात’, असे विचारले आणि अशा ठिकाणांची नावे स्वतः लिहून घेतली; तसेच ‘‘असे प्रकार घडत असतील, तर आम्हाला दूरध्वनी वरून कळवा; परंतु तुम्ही स्वतः काही ही कारवाई करू नका’’, असे सांगितले. (पोलिसांनी अशा अपप्रकरांच्या विरोधात स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)
     सातारा येथे एम्.आय.डी.सी पोलीस ठाणे येथील श्री एम्.एस्. मेतकर, पोलीस सहायक यांना निवेदन देण्यात आले. तसेच संगम माहुली ग्रामपंचायत येथेही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विजया कणसे, सौ. स्मिता करे तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी दळवी आणि श्री. विलास कुलकर्णी हे उपस्थित होते.
   बेळगाव - येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक श्री. अमरनाथ रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी रणरागिणी डॉ. ज्योति दाभोलकर, सौ. किरण बंग, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अक्काताई सुतार, तसेच अन्य धर्माभिमानी महिला उपस्थित होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn