Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोल्हापूर येथील मोर्च्यात पाकचा ध्वज घेऊन सहभागी असणार्‍यांवर कारवाई करा ! - शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करतांना शिवसैनिक
     कोल्हापूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - १४ डिसेंबर या दिवशी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी असलेली एक व्यक्ती पाकिस्तानी ध्वज घेऊन फिरत होती. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग होऊ शकतो, तरी अशा समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
या वेळी सर्वश्री सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, विनोद खोत, सुधीर राणे, राजू सांगावकर, सौ. शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, सौ. रिया पाटील, सौ. दीपा शिंदे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरच्या निवेदनावर जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे, शहरप्रमुख श्री. शिवाजीराव जाधव आणि श्री. दुर्गेश लिंग्रस यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. श्री. संजय पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सतत भारत विरोधी कृती करून देशातील शांतता भंग करण्याचा रडीचा पाकिस्तान नेहमी खेळत असतो. अशा प्रकारे पाकिस्तानी ध्वज घेऊन कोल्हापुरातील सलोख्याचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवणार्‍या या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn