Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! - हिंदु धर्माभिमानी

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      वाराणसी - बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराचे सूत्र संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित करावे आणि हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, यांसाठी १८ डिसेंबर या दिवशी येथील शास्त्रीघाट, वरुणापूल येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील मागणीचे निवेदन रेल्वे मंत्रालयाला देण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. या वेळी ‘इंडिया विथ विझडम्’, हिंदु युवा वाहिनी, हिंदु युवा शक्ती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि हिंदु धर्माभिमानी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
रेल्वे स्थानकांवर चित्रे लावण्याएवढी अकबराची पात्रता नाही ! 
- श्री. मनीष पाण्डेय, प्रदेश उपाध्यक्ष, हिंदु युवा वाहिनी
      अकबर मोगलांसाठी मोठा असेल, हिंदूंसाठी नाही. त्याची चित्रे भारताच्या रेल्वे स्थानकांवर लावण्याएवढी त्याची पात्रता नाही. जर त्याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्यात आली, तर हिंदु युवा वाहिनी आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ ती उखडून फेकतील.
  • हिंदुत्वनिष्ठ सरकारने क्रूर अकबराचे चित्र रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय घेणे आश्‍चर्यकारक !
  • - श्री. माताप्रसाद गुप्ता, माजी अध्यक्ष, व्यापारी मंडळ
  • देशाचे नेतृत्व एका हिंदु व्यक्तीच्या हातात असतांना हिंदु स्वाभिमान दिवस साजरा करण्याऐवजी क्रूर अकबराचे चित्र रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय घेतला जाणे आश्‍चर्यकारक आहे.
  • अकबराची नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांची प्रशंसा झाली पाहिजे ! - श्री. निर्भय सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु युवा शक्ती
  • देशात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यामुळे हिंदूंची ओळख शिल्लक आहे. त्यांची प्रशंसा झाली पाहिजे, अकबराची नाही. राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी होणे हा माझा गौरव समजतो.
आंदोलनातील उपस्थित मान्यवर
      हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता यशवंत सिंह, हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पाण्डेय, महानगर अध्यक्ष श्री. विजय जायसवाल, हिंदु युवा शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निर्भय सिंह, माजी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. माताप्रसाद गुप्ता, शीवपूर वाराणसीचे धर्माभिमानी श्री. आकाश पाण्डेय, सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश सिंगबाळ आदी धर्माभिमानी या आंदोलनात उपस्थित होते.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn