Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मडगाव (गोवा) येथील ‘अभिव्यक्ती दक्षिणायन’ परिषदेतील पुरो(अधो)गाम्यांचे हिंदुद्वेष्टे विचार अन् परिषदेच्या आयोजनाच्या संदर्भात लक्षात आलेल्या त्रुटी

चित्रकार नामानंद मोडक यांचा सनातनवर खोटा आरोप !
(म्हणे) ‘एम्.एफ्. हुसेन यांच्याविषयी कौतुकास्पद उद्गार काढल्याने सनातनचा मला विरोध !’
म.फि. हुसेन यांनी भारतमाता, तसेच हिंदूंच्या देवता यांची अत्यंत 
अश्‍लाघ्य आणि विकृत चित्रे काढल्यामुळेच हिंदु जनजागृती समिती, 
सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती ! 
अशांच्या चित्रांचे कौतुक करणे म्हणजे राष्ट्रद्रोह अन् धर्मद्रोह यांना पाठिंबा देणेच आहे ! 
      मडगाव - ‘महाराष्ट्रात एके ठिकाणी एका चित्रकाराच्या प्रदर्शनामध्ये मी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांच्याविषयी कौतुकास्पद उद्गार काढले होते. यामुळे मला सनातनच्या अध्यक्षाने बोलावले. त्यामुळे मला भीती वाटली’, असा आरोप चित्रकार रामानंद मोडक यांनी केला. (धादांत खोटे बोलणारे मोडक ! सनातनमध्ये अध्यक्षपद असे काही नसते, तर विश्‍वस्त आहेत, हेही ठाऊक नसणारे मोडक ! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्‍यांमध्ये खरे स्वरूप जाणा ! - संपादक) येथील अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत ‘अंधश्रद्धा आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील चर्चासत्रात बोलतांना चित्रकार मोडक यांनी सदर आरोप केला. या चर्चासत्राचे अध्यक्षपद तारा भवलकर यांनी भूषवले. या चर्चासत्रात गोव्यातील सनातनद्वेष्टे चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांचीही उपस्थिती होती.
      चित्रकार मोडक पुढे म्हणाले, ‘‘चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांच्या एका चित्राविषयी मी चांगले उद्गार काढले. यानंतर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एकाने मला भेटून काही सूत्रांवर आपणास चर्चा करायची असल्याचे सांगितले आणि मला प्रेक्षागृहाबाहेर नेले. प्रेक्षागृहाबाहेर गेल्यानंतर ‘त्या’ गृहस्थाने आपणास चारचाकी वाहनतळापाशी नेले. यासंबंधी आपणास संशय आल्यावर आपण अधिक चौकशी केली. या वेळी आपणास ‘त्या’ गृहस्थाने सांगितले की बाजूच्याच एका चारचाकीमध्ये बसलेले सनातनचे अध्यक्ष आपल्याशी बोलू इच्छितात. आपण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथून निघून थेट चित्रकार प्रदर्शनाच्या आयोजकांना भेटलो आणि यानंतर पुढे हे प्रकरण निभावण्यात आले.’’ (चित्रपटात शोभतील, अशा कथा केवळ पुरोगामीच रचू शकतात ! - संपादक)
श्री गणेशाची मानवी रूपातील अत्यंत अवमानकारक 
चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार सुबोध केरकर म्हणतात, 
‘‘सनातन संस्थेने विनाकारण माझ्या गणपतीच्या चित्रांना विरोध केला !’’
सनातन संस्था धर्मरक्षणासाठी कटीबद्ध आहे ! अभिव्यक्तीच्या नावाखाली देवतांची
विटंबना करण्याचे पुरोगामी षड्यंत्र असेल, तर सनातन संस्था त्याला नेहमीच विरोध करील !
      गणपतीचे व्यंगचित्र बर्‍याच कालावधीपासून दाखवण्यात येत आहे आणि याला कोणीही कधीही विरोध केलेला नाही; मात्र मी गणपतीची व्यंगचित्रे काढल्यानंतर त्याला सनातन संस्थेने विरोध केला. 
      या वेळी स्वतःचे म्हणणे इतरांवर थोपवण्यासाठी चर्चासत्राच्या वेळी सुबोध केरकर यांनी स्वत: काढलेली गणपतीची विडंबनात्मक चित्रे दाखवण्याऐवजी गणपतीच्या मांडीवर बसलेले गांधी किंवा इतर राष्ट्रपुरुष यांची चित्रे उपस्थितांना दाखवली. (असे खोटारडे पुरोगामी म्हणे समाजाला प्रगतीपथावर नेणार ! - संपादक)
दक्षिणायन परिषदेविषयी जाणवलेली सूत्रे
१. प्रतिनिधींसाठी पुष्कळ निधी देऊन हॉटेलमध्ये रहाण्याची सोय केली होती.
२. परिषदेसाठी एकूण ३६ लक्ष रुपये एवढा अवाढव्य खर्च करण्यात आला. 
३. परिषदेला विरोध होऊ नये, या भीतीपोटी आयोजकांनी परिषदेच्या परिसरात आणि सभागृहात साध्या वेषात खाजगी सुरक्षारक्षक (बाऊन्सर्स) ठेवले होते. हे सुरक्षारक्षक परिषदेत सहभागी असलेले प्रतिनिधी असल्याप्रमाणे वावरत होते.
४. परिषदेसाठीच्या प्रवेशशुल्कासाठी विद्यार्थ्यांना सवलत दिली; मात्र विद्यार्थी तेथे फिरकलेही नाहीत. काही महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एक घोळका तेथे आला होता; मात्र त्यांचा मौजमजा करण्याकडे अधिक ओढा होता. काही विद्यार्थी तर रवींद्र भवनच्या बाहेरच बसून राहिले आणि नंतर निघून गेले.
५. ‘गोवा फॉरवर्ड’चे नेते, काँग्रेसचे नेते विजय सरदेसाई हेही तेथे येऊन गेले. 
६. आयोजकांनी ४ ठिकाणी चर्चासत्रांचे आयोजन केले होते. यांना अतिशय अल्प होती. त्यामुळे चर्चासत्रांच्या सूत्रनिवेदकांना उपस्थितांना जवळ येऊन बसण्याची विनंती करावी लागली. 
७. चर्चासत्रामध्ये सहभागी वक्त्यांना ऐनवेळी विषय कळवण्यात आल्याने काही वक्त्यांनी खेद व्यक्त करत भलताच विषय मांडला. एका चर्चासत्रामध्ये सूत्रनिवेदक न आल्याने अन्य लेखकाला सूत्रनिवेदनाचे दायित्व देण्यात आले. 
८. काही वक्ते मराठीतूनच बोलल्याने अन्य भाषिकांना विषय समजला नाही. ९. १९ नोव्हेंबरला पहिले सत्र १ घंटा उशिरा चालू झाले.
दक्षिणायन परिषदेचे आयोजन करणार्‍यांचे अज्ञान कि कावेबाजपणा ?
१. सनातन संस्थेचा विषय कार्यक्रमपत्रिकेत नसतांना त्यावर कोणतीही चर्चा न घेता तिच्या विरोधातील ठराव संमत : मडगाव येथे रवींद्र भवन येथे १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत दक्षिणायन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ४ ते ५ सभागृहांमध्ये चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. सर्व चर्चासत्रे कार्यक्रमपत्रिकेत नमूद करण्यात आली होती; मात्र कुठलेही चर्चासत्र ‘सनातन’ किंवा ‘सनातनची कार्यप्रणाली’ यांवर आधारित नव्हते. तरीही शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या ठरावात सनातनच्या विरोधातील ठराव अग्रक्रमावर होता. ठरावात ‘संस्था धार्मिक तेढ निर्माण करते’, ‘संस्थेच्या सदस्यांचा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यांमागे सहभाग आहे’, अशी सूत्रे होती. मुळात सनातन संस्थेचा विषयच कार्यक्रम पत्रिकेत नव्हता, तरीही ठराव वाचण्यात आला.
२. ठराव उपस्थितांसमोर न मांडता आणि उपस्थितांचे अनुमोदनही न घेता परिषदेतील ठराव संमत ! : येथे गंभीरपणे विचार करण्याचे सूत्र म्हणजे शेवटच्या क्षणी ठराव वाचण्यात आले. ना हे ठराव मांडण्यात आले, ना या ठरावांना अनुमोदन देणारा ठराव संमत करण्यात आला ! परिषदेच्या नावातच सर्वप्रथम अभिव्यक्ती असून त्यांनी उपस्थितांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. परिषदेला १ सहस्र रुपये देऊन उपस्थित असलेल्या सभासदांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर हा अन्याय नव्हे का ?
- श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा
परिषदेतून निरीश्‍वरवाद, समतावाद, साम्यवाद हरल्याचा सूर 
    निरीश्‍वरवाद, समतावाद, साम्यवाद यांना सामान्य लोकांनी नाकारल्याचा सूर उमटला. ‘सामान्य माणसांच्या सांस्कृतिक भावना, पाळेमुळे यांपासून दूर राहिलो; म्हणून अपयशी ठरलो’, असा सूर प्रत्येकाने आळवला. चर्चेचे विषयही या अपयशाचे खापर मोदी शासनावर फोडण्याच्या दृष्टीने निवडले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn