Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने ‘धसई’ होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले चलनविरहित गाव !

श्री. रणजित सावरकर
       मुंबई - नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावात व्यवहार चलनविरहित (कॅशलेस) करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. अशाप्रकारे नोटबंदी नंतर चलनविरहित होणारे धसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे. (गाव चलनविरहित करण्यासाठी प्रयत्न करणारे श्री. रणजित सावरकर यांचे अभिनंदन ! त्यांचा आदर्श प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे ! - संपादक)
     हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून संपूर्णतः चलनविरहित झाले. गावाची लोकसंख्या १० सहस्र आहे. येथे जवळपास १०० व्यावसायिक आहेत. आसपासची साधारण २५ खेडी व्यवहारांसाठी धसईवर अवलंबून आहेत. चलनविरहित होण्याचा लाभ धसई आणि आजूबाजूच्या परिसरातील अनुमाने ५० सहस्र लोकांना होणार आहे. १०० पैकी अनुमाने ३४ व्यापार्‍यांचे कार्ड स्वाईप मशीन ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित झाली. अन्य व्यापारी या मशीन्स घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई पूर्ण करत आहेत.
     येथील प्रत्येक कुटुंबाकडे जन-धन खाते असून डेबिट कार्ड ही आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून या भागातील लोक त्यांच्या सर्व गरजांकरता हे कार्ड वापरू लागले आहेत. अगदी वडापाव पासून भाजीपाला, धान्य, औषधे, खते आणि इतर सर्व गरजांसाठी डेबिट कार्ड वापरत आहेत. केशकर्तनालये, दवाखाने, मोटार गॅरेजेस पासून अगदी शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरता येईल. 
     श्री रणजित सावरकर यांना या कामात धसई येथील कार्यकर्ते श्री. कैलास घोलप, श्री. अशोक घोलप आणि श्री. स्वप्नील पाटकर तसेच मुंबई येथील श्री. पृथ्वीज माटे यांनी बहुमोल साहाय्य केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक श्री. नवतेज सिंह यांनी अत्यंत तत्परतेने, अल्प वेळात व्यापार्‍यांची खाती उघडून त्यांना कार्ड स्वाईप मशीन देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले.
सर्व जन प्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा ! - रणजित सावरकर
     श्री. रणजित सावरकर म्हणाले, ‘‘चलनाव्यतिरिक्त व्यवहार असणारी अर्थव्यवस्था हे माझे स्वप्न होते. राज्यसभेत एका सदस्याने ‘शेतकरी काय धोतरात डेबिट कार्ड घेऊन फिरतो का ?’ ही शेतकर्‍यांचा अपमान करणारी एक टिप्पणी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणारी जिद्द निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. या सदस्याच्या टिपणीस मात्र कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. शेतकरी गरीब असतील; पण ते मूर्ख नाहीत. ते डेबिट कार्ड बाळगतात आणि एटीएम्मध्ये वापरतात सुद्धा. जर व्यापारी डेबिट कार्ड घेऊ लागले तर ? मग सर्व प्रश्‍नच संपेल. चलनविरहित धसई केवळ एक आरंभ आहे. धसईने हेच सिद्ध केले की चलनविरहित गाव हे ध्येय साध्य करण्यासाठी लोक सिद्ध आहेत, बँका सिद्ध आहेत, व्यापारी सिद्ध आहेत, आवश्यकता आहे यांना एकत्रित आणण्याच्या दुव्याची ! तेव्हा सर्व जन प्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या दृष्टीने पुढाकार घ्यावा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn