Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महाराष्ट्रात १ कोटीहून अधिक बनावट शिधापत्रिका !

बनावट शिधापत्रिका देऊन देशाच्या सुरक्षेशी खेळणारे 
दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांना कारागृहात डांबा !
      नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - राज्यात एक कोटीहून अधिक शिधापत्रिका बनावट आहेत, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात सांगितले. (यामध्ये किती बांगलादेशी घुसखोर किंवा जिहादी असतील, याचा विचारही न केलेला बरा ! - संपादक) बनावट शिधापत्रिकांचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. आधारपत्रिकेसोबत शिधापत्रिका जोडल्यामुळे बनावट शिधापत्रिकांची माहिती समोर आली आहे. बनावट शिधापत्रिकांमुळे धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात आहे. त्यामुळे पुढील तीन मासांत सर्व शिधापत्रिका दुकानांवर ‘पॉस मशिन’ बसवण्यात येईल. तसेच ‘बायोमेट्रीक’ पद्धतीने धान्य वितरीत केले जाईल. ही पद्धत चालू केल्यानंतर बनावट शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे लागणार नाही. स्वस्त धान्य दुकानदारांचे शुल्कही (कमिशन) वाढवण्यात येणार आहे. धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn