Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्यातील सहकारी पतसंस्था आणि बँका यांतील १ सहस्र ४५० संचालकांकडून २०० कोटी रुपये वसूल करणार ! - सहकारमंत्री सुभाष देशमुख

राज्यातील सहकारी संस्थांमधील अपहार प्रकरणी
 १ सहस्र ६९ व्यक्तींकडून १ सहस्र ६७० कोटी रुपये वसूल करणार ! 
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - ३० नोव्हेंबरअखेर राज्यातील विविध नागरी सहकारी पतसंस्था आणि बँका यांमध्ये लक्षावधी रुपयांचा अपहार करणार्‍या संस्थेतील १ सहस्र ६९ व्यक्तींवर १६७०.९० कोटी रुपयांचे दायित्व निश्‍चित करण्यात आले आहे. या सर्वांकडून संस्था आणि बँक यांमधील अपहाराची रक्कम वसूल करण्यात येईल. यापैकी राज्यातील सहकारी पतसंस्था आणि बँका यांतील १ सहस्र ४५० संचालकांकडून २०० कोटी रुपये वसूल करणार आहोत, अशी माहिती सहकार मंत्री श्री. सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. राज्यातील सहकारी संस्था आणि बँका यांमध्ये अपहार करून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटणारे उत्तरदायी दोषी संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून तो पैसा ठेवीदारांना परत करावा, अशी एकमुखी मागणी सदस्यांनी केली. या प्रश्‍नोत्तरातील प्रश्‍नाच्या चर्चेत भाग घेतला. (गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार करून स्वतःची तिजोरी भरणारे लोकप्रतिनिधी, बँकांचे संचालक, कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचारी यांच्या संपत्तीचा लिलाव करून तो पैसा ठेवीदारांना परत केला पाहिजे आणि दोषी संचालक आणि कर्मचारी यांना आजन्म कारावासाची शिक्षा करणे अपेक्षित आहे ! - संपादक) 
     श्री. सुभाष देशमुख म्हणाले की, ३० नोव्हेंबर २०१६ अखेर राज्यातील ७३ नागरी सहकारी बँका आणि १४७ नागरी सहकारी पतसंस्थांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संस्था आणि बँका यांमधील संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना रक्कम वसुलीच्या नोटिसा पाठवून देण्यात आल्या आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn