Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या कालावधीत साधिकेला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती 
१ अ. खोलीत प्रवेश केल्यावर वातावरण प्रसन्न वाटणे आणि हा पालट सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळेच झाल्याचे जाणवणे : ‘जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यासाठी प.पू. रामभाऊस्वामी रामनाथी आश्रमात आले होते. त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी खोलीत प्रवेश केल्यावर तेथील वातावरण प्रसन्न वाटत होते. त्या वेळी वातावरणात सहजता आणि मोकळेपणाही वाटत होता. वातावरणातील ‘हा पालट सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळेच झाला आहे’, असे मला जाणवले.
१ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांतून नारिंगी रंगाचे किरण वातावरणात पसरतांना दिसणे आणि त्यांच्या जागी प.पू. डॉक्टरच बसल्याचे जाणवणे : या सत्कार सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आसंदीवर आसनस्थ झाल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या चरणांतून नारिंगी रंगाचे किरण वातावरणात पसरतांना दिसले. त्यांच्याभोवती नारिंगी रंगाचे वलय निर्माण झालेले दिसले. त्याच वेळी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आसंदीवर नारंगी रंगाचा गोळा दिसला. नंतर त्यांच्या चरणांजवळ श्रीरामाच्या सिंहासनाचा जिथे पाठ टेकतो, तसा आकार दिसला आणि त्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे चरण दिसले. काही वेळाने ‘त्यांच्याऐवजी प.पू. डॉक्टरच तेथे बसले आहेत’, असे दिसले.
२. उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती 
२ अ. यज्ञाच्या वेळी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ हे यजमानपद भूषवतांनाचे दृश्य देवलोकातील असल्याचे जाणवणे : यज्ञाच्या वेळी पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ हे यजमानपद भूषवत होते. त्या वेळी ते देवलोकातील दृश्यच जाणवत होते. सत्ययुगातही संतच यजमान असायचे. त्यामुळेही यज्ञकर्माची फलनिष्पत्ती अधिक असायची. 
२ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ प.पू. रामभाऊस्वामी यांना पुष्पे किंवा आहुती देण्यासाठी उभ्या असतांना ‘त्यांचा हात देवीचाच आहे’, असे वाटत होते.
२ इ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखावर त्यांचाच दैवी मुखवटा चढलेला दिसणे : यज्ञाच्या वेळी त्यांची दोन रूपे दिसत होती. एका क्षणी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ हे रूप दिसायचे आणि त्या स्थिर असतांना दुसर्‍या क्षणी त्यांच्या मुखावर त्यांचाच दैवी मुखवटा चढलेला दिसायचा. जणू काही ‘त्या देवलोकातूनच पृथ्वीवर आल्या आहेत’, असे मला जाणवले.
२ ई. अभिषेकाचा विधी करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याभोवती फिकट आकाशी रंगाचे वलय निर्माण झालेले दिसणे आणि त्या वेळी त्या सगुण-निर्गुण स्तरावर कार्य करत असल्याचे जाणवणे : १८.१.२०१६ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अभिषेकाचा विधी करतांना त्यांच्याभोवती फिकट आकाशी रंगाचे वलय निर्माण झालेले दिसले. त्या वेळी त्या सगुण-निर्गुण स्तरावर कार्य करत असल्याचे जाणवले. विधीच्या वेळी त्यांच्याकडून तारक-मारक शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. त्या वेळी त्यांच्यामधील विविध भावांचे रंगही दिसत होते.’ 
- सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn