Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाविषयी अनुभवण्यास मिळालेली सूत्रे

    २ ऑगस्ट २०१६ ते ५ ऑगस्ट २०१६ या कालावधीत प.पू. गुरुदेवांच्या आश्रमदर्शनाची संधी उपलब्ध झाली, त्या वेळी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
१. रामनाथी आश्रमाचे वर्णन शब्दांत करणे अवघड आहे. गुरुमाऊलीने येथे आनंदाचा सागरच ठेवला आहे. या आनंदरूपी सागरात एकदा जरी स्नान केले, तरी अनंत जन्मांची शुद्धी केल्याचे प्रत्येक क्षणी अनुभवयास मिळाले.
२. आश्रम म्हणजे अनंत गुणांचा समूह आहे.
३. आश्रमातील प्रत्येक कक्ष हा पुढे विश्‍वातील केंद्रबिंदू ठरणार आहे, याची प्रचीती त्या-त्या ठिकाणी काही वेळ थांबल्यावर येते.
४. आश्रमातील प्रत्येक साधकाच्या अनाहतचक्रावर दीपाग्नी शांत आणि स्थिर प्रज्वलित आहे, असे प्रत्येकाच्या संदर्भात जाणवते. त्या ज्योतीबिंदुचा रंग पांढरा, पिवळा, सोनेरी, सप्तरंगी अशा निरनिराळ्या रंगामध्ये दिसतो.
- श्री. गौरीशंकर कालशेट्टी, अकोला (१०.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn