Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संसदेत हिंदु राष्ट्राचा ठराव आणा !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपला हाक !
      मुंबई - कधी नव्हे तो हिंदू एकवटला आणि काँग्रेस, गांधी घराणे, जवाहरलाल नेहरू यांचे पाप भाजपच्या पदरात टाकले. एकहाती सत्ता दिली. तुम्हाला मुफ्ती महंमद चालतो, मेहबुबा मुफ्ती चालते; मात्र शिवसेनेचे कडवट हिंदुत्व चालत नाही. हे कसले तुमचे हिंदुत्व ? देेशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा ठराव संसदेत आणा, शिवसेनेचे सर्व खासदार त्याला पाठिंबा देतील, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी भाजपला केले. शिवसेना नेते, खासदार तथा दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांचे प्रत्येक गुरुवारी दैनिक ‘सामना’मध्ये ‘सच्चाई’ सदर प्रसिद्ध होते. या सदराच्या पुस्तकाच्या दोन खंडांचे प्रकाशन श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. उद्धव ठाकरे बोलत होते. हा सोहळा १७ डिसेंबर या दिवशी माटुंगा येथील रुईया कॉलेजच्या सभागृहात पार पडला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ‘राजा’ प्रकाशनचे श्री. ज्ञानेश्‍वर मुळे आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की,
१. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकाल किंवा हराल; पण ‘एवढ्या दिवसांत राममंदिर बांधतो’, असे घोषित करा. उत्तर प्रदेशात शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल.
२. नोटाबंदीनंतर ४० दिवस होत आले, तरी जनतेचे हाल चालूच आहेत. नोटाबंदीनंतर सर्व आलबेल होण्याचे हे मृगजळ तर ठरणार नाही ना ? जनता सहनशील आहे; मात्र या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
     ‘सच्चाई’ या सदराचे कौतुक करतांना श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सच्चाई हे सदर नसून तो एक इतिहास आहे. ‘सामना’मधून सामान्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम समर्थपणे चालू आहे. त्यामुळे ‘सामना’ हे सर्वसामान्यांचे शस्त्रच झाले आहे.’’ 
हिंदुत्वाविना भाजप कधी जिंकू शकणार नाही ! - डॉ. स्वामी
     राममंदिराविषयी डॉ. स्वामी म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने एक अभूतपूर्व निर्णय देऊन मला या खटल्यात पिटिशनर केले आहे. ४ जानेवारीला सुनावणी आहे. मला विश्‍वास आहे की, सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू, मंदिरे तिथेच बनणार. सौदी अरेबियासारख्या राष्ट्रात मशीद पाडून रस्ते आणि इमारती बांधल्या आहेत. मी काही इस्लामी राष्ट्रांतील विद्वानांना विचारले की, ‘तुमच्या धर्मात मशिदीचे स्थान काय ?’ तेव्हा मशीद म्हणजे केवळ नमाज पढण्याचे स्थळ असल्याचे मला सांगण्यात आले. राममंदिर आणि मशीद दोन्ही समान कसे असू शकते ? मंदिरात ईश्‍वराची प्राणप्रतिष्ठा होते. भगवान हाच मंदिराचा मालक असतो. आपण केवळ विश्‍वस्त असू शकतो. ८० टक्के हिंदूंच्या देशात ४० टक्के हिंदू जरी एकवटले, तरी दोन तृतीयांश बहुमत मिळून कायमस्वरूपी हिंदु राष्ट्र येईल. हिंदुत्वाशिवाय भाजप कधी जिंकू शकणार नाही.’’
‘सामान्यांच्या न्यायासाठी आणि हिंदुत्वासाठी दैनिक ‘सामना’च्या माध्यमातून
लढणारा शिपाई’, ही माझी ओळख ! - खासदार संजय राऊत
     या वेळी खासदार श्री. संजय राऊत म्हणाले, ‘‘सामना म्हणजे युद्धभूमी. सामान्य माणसाचा न्याय असो किंवा हिंदुत्व असो, या लढ्याची युद्धभूमी म्हणजे ‘सामना’. त्या युद्धभूमीवर लढणारा शिपाई अशी माझी ओळख आहे. २५ वर्षांपासून लोकांची वेदना मांडण्याचे काम मी करीत आलो. ही बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी माझ्यासारख्या पत्रकाराला दिली. अनेक लढाया लढून ‘सामना’च्या तलवारीची धार न्यून झाली नाही. प्रत्येक वेळी ती नव्या लढाईसाठी सज्ज असते. उद्धव ठाकरे या तलवारीची मूठ आहेत.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn