Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व
‘      वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
३. साधना म्हणजे काय ?
     ‘हिंदु धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता ईश्‍वरप्राप्तीतच आहे. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाच्या प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. काही जण वैयक्तिक साधना म्हणून पूजा-अर्चा, नामजप, ध्यानधारणा, योगासने, यज्ञयाग, तीर्थक्षेत्री जाणे इत्यादी धार्मिक कृती करत असतात. गुरुप्राप्ती झालेले काही जण त्यांच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली समष्टी साधना म्हणून सनातन धर्माचा प्रसार, समाजसाहाय्य, राष्ट्रजागृती आणि धर्मरक्षण आदी कृती करत असतात. काही जण भारतमातेला देवता मानून तिच्या कार्यासाठी समर्पित झालेले असतात, म्हणजेच कर्मयोगानुसार साधना करत असतात.’ (३.५.२०१४)
४. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे 
कार्य करतांना कोणती साधना करावी ?
४ अ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करणे : हिंदूंनो, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आदींप्रमाणे आदर्शरित्या राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होवो’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करा ! (२५.५.२०१३) 
४ अ १. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिदिन प्रार्थना करणे : ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एखाद्या अन्य संघटनेचा उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा. 
४ अ २. देवतेला प्रार्थना करूनच हिंदु राष्ट्राविषयीच्या भाषणाचा आरंभ आणि शेवट करणे : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे वक्ते नेहमीच भगवान श्रीकृष्णाला वंदन करून हिंदु राष्ट्राविषयीच्या भाषणाला प्रारंभ करतात. तसेच भाषणाच्या शेवटीही ते प्रार्थना करतात. त्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळायला साहाय्य होते.’ (२३.४.२०१२) 
४ आ. संकटप्रसंगी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या उपास्यदेवतेचा किंवा भगवान श्रीकृष्णाचा सतत नामजप करा ! : ‘धर्मरक्षणाचे कार्य करतांना बर्‍याच वेळा हिंदुत्वनिष्ठांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा वेळी चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे आपली स्थिती होते. अशा संकटकाळी ईश्‍वराचे साहाय्य मिळावे, यासाठी आपण नियमितपणे आपल्या उपास्यदेवतेची किंवा धर्मसंस्थापनेच्या ध्येयानुसार भगवान श्रीकृष्णाची उपासना केली पाहिजे. 
     ज्या देवतेची आपण अनेक वर्षे उपासना करत असल्याने तिच्याविषयी आपल्याला अनुभूती येत असतात, अशी देवता म्हणजे उपास्यदेवता ! आपण कुठल्याही विशिष्ट देवतेची उपासना करत नसाल, तर धर्मसंस्थापनेची देवता असलेल्या भगवान श्रीकृष्णाची उपासना करा ! सध्याच्या काळानुसार ती आवश्यक आहे. 
     वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी आपल्या उपास्यदेवतेचा नामजप किंवा भगवान श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप सतत करावा. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी रामराज्याचा अधिपती असलेल्या प्रभु श्रीरामाची उपासना करणे आवश्यक असेल. केवळ त्याच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्र ‘रामराज्या’सारखे होऊ शकेल.’ (१.४.२०१३)
४ इ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणार्‍यांनी नामजप करणे महत्त्वाचे !
१. ‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसह तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. 
२. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही.
     यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना नामजप करणे किती आवश्यक आहे’, हे लक्षात येईल.’ (३.५.२०१४) (क्रमश:) 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn