Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदूंनी नेभळटपणा झटकून सिंहगर्जना करून धर्मद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवावी ! - कु. मृणाल जोशी

डावीकडून श्रीमती वैशाली कातकाडे, कु. मृणाल जोशी, श्री. शशिधर जोशी
      येवला (नाशिक) २० डिसेंबर (वार्ता.) - संपूर्ण भारतामध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या वेचून वेचून हत्या होत आहेत, अनेकांना अपकीर्त करून त्यांचे कार्य बंद पाडले जात आहे. सनातन संस्थेचे कार्य बंद पाडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे; मात्र यातून सत्य बाहेर येऊन सनातन संंस्था आपले निर्दोषत्व सिद्ध करील. धर्मद्रोही, नास्तिकवादी, पुरोगामी, धर्मांध यांनी हि्ंदुविरोधी उच्छाद मांडला आहे; मात्र त्यांनी लक्षात घ्यावे की, आमच्या देवता आम्हाला दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची शक्ती देणार्‍या आहेत. हिंदूंनी नेभळटपणा झटकून सिंहगर्जना करून धर्मद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवावी, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या कु. मृणाल जोशी यांनी केले.
१८ डिसेंबर या दिवशी स्वामी मुक्तानंद शाळा मैदान, येवला या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांच्यासमवेत व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी, रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे उपस्थित होत्या. या सभेला येवला आणि पंचक्रोशीतील २०० हून अधिक धर्माभिमान्यांनी कडाक्याच्या थंडीतही उपस्थिती लावली. या वेळी स्वसंरक्षणाची काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.       सभेचा प्रारंभ शंखनादाने झाल्यानंतर दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वेदमंत्रपठण झाले. सभेचे सूत्रसंचालन सौ. रितुल पाटील यांनी केले, तर समितीच्या कार्याची ओळख श्री. शिवाजी उगले यांनी करून दिली.
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हिंदूंना संघटनाविना पर्याय नाही !
 - श्री. शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती
      या देशात बुरहान वाणी, इशरत जहाँ यांना देशभक्त, तर साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, समीर गायकवाड आदींना देशद्रोही ठरवले जात आहे. स्वातंत्र्यकाळापासून केवळ आणि केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. म्हणून सर्वांनी वेळीच सावध होऊन संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिलांनी आत्मरक्षणार्थ स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !
 - श्रीमती वैशाली कातकाडे, रणरागिणी शाखा
      दिवसेंदिवस स्त्रिया, मुली यांवरील अत्याचार वाढत आहेत, त्या वासनांधतेच्या शिकार बनत आहेत. त्यामुळे महिला आणि मुली यांनी कोणावरही अवलंबून न राहता आता स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वत:चेच रक्षण करावे, असे आवाहन रणरगिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे यांनी केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn