Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यास सहस्रोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित रहा ! - हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेद्वारे आवाहन

जळगाव येथे २५ डिसेंबर या 
दिवशी हिंदु धर्मजागृती सभा ! 

डावीकडून श्री. प्रशांत जुवेकर, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, श्री. राजकुमार
गवळी, श्री. सुनील घनवट, पू. नंदकुमार जाधव आणि कु. रागेश्री देशपांडे

         जळगाव - धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आज या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजावर अनेक बंधने लादली जात आहेत. आज भारतात धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘केवळ हिंदूंसाठी कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे’ अशी स्थिती झाली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना प्रशासन किंमत देत नाही. हिंदूंच्या समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदूंचे प्रभावी संघटन. त्यासाठीच जळगाव येथे रविवार, २५ डिसेंबर २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त येथील पद्मालय विश्रामगृहात समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, बारा बलुतेदार समाजाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री. राजकुमार गवळी, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर उपस्थित होते.
         श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील ही ५६ वी सभा आहे. आतापर्यंत सुमारे २ लाख ३२ सहस्र ९०० धर्माभिमान्यांनी जिल्ह्यात झालेल्या सभांचा लाभ घेतला आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित केलेल्या या सभांना जळगाव येथील हिंदु बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
         सनातनचे पू. नंदकुमार जाधव म्हणाले की, समाजसाहाय्य, राष्ट्र आणि धर्म रक्षणासमवेत हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, या ध्येयाने कार्यरत असलेल्या सनातन संस्थेचे सर्व साधक ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी समर्पित भावाने कृतीशील आहेत.
         बारा बलुतेदार समाजाचे राज्य संपर्क प्रमुख श्री. राजकुमार गवळी म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी जसे बारा बलुतेदार समाजाला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज सर्व हिंदूंना संघटित करण्याचे कार्य समिती करत आहे. त्यासाठी घेण्यात येणार्‍या या सभेला बारा बलुतेदार समाजाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे मी जाहीर करतो.
         शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री. मोहन तिवारी म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे वर्तमान कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे हे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रत्येकाने कृतीशील होणे आवश्यक आहे. समिती या सभेच्या माध्यमातून हाच विचार प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवत आहे.
         रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी सभेनिमित्त चालू असलेल्या प्रचारकार्याची माहिती दिली. सभेच्या प्रचारासाठी २२ डिसेंबरला भव्य अशा वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबरपासून रिक्षा उद्घोषणांच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.
         या वेळी पत्रकारांना ‘पॉवर पॉइंट प्रेझेटेंशन’द्वारे सभेचा आतापर्यंतचा प्रसारकार्याचा आढावा प्रोजेक्टरद्वारे सादर करण्यात आला. या वेळी स्थानिक दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असणार्‍याने ९४०४९५६०२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn