Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी संघाचे १३ कार्यकर्ते दोषी !

केरळ किंवा एकूणच दक्षिण भारतात हिंदु नेत्यांच्या हत्या केल्या जात आहेत; मात्र या हत्यांच्या प्रकरणी कोणाला अटक होत नाही आणि झाली, तर त्यांना शिक्षाही लवकर होत नाही ! कम्युनिस्टांनी संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचा आरोप आहे; मात्र त्यांनाही शिक्षा होत नाही ! 
      थिरूवनंतपुरम् - येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विष्णु यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ कार्यकर्त्यांना थिरुवनंतपुरम्मधील स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टीके उन्नीमोल यावर शिक्षा सुनावणार आहेत. १ एप्रिल २००८ मध्ये ही हत्या करण्यात आली होती. 
      थिरूवनंतपुरममधील कैथामुक्कु येथील विष्णु यांच्या घरातच तलवार आणि अन्य धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १६ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्‍याला निर्दोेष ठरवण्यात आले, तर तिसरा फरार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn