Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा 'सनबर्न' महोत्सव रहित करा ! - हिंदु जनजागृती समिती

भाजप आमदार श्री. महेश लांडगे (डावीकडून दुसरे) 
यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     आळंदी (जिल्हा पुणे), १० डिसेंबर (वार्ता.) - पॉप संगीताच्या नावाखाली युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे नेणारा 'सनबर्न' संगीत महोत्सव २८ ते ३१ डिसेंबर या काळात पुणे परिसरात होणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील केसनंद या गावी होणारा हा महोत्सव भारतीय संस्कृतीला गालबोट लावणारा आहे. हा महोत्सव रहित करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
आळंदी येथे नगरपरिषद निवडुणांमध्ये उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. या वेळी भाजप किसान मोर्च्याचे माजी उपाध्यक्ष श्री. केशव कामठे यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. दत्ता गव्हाणे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री पराग गोखले, मिलिंद धर्माधिकारी, नीलेश पवार, अनिकेत हराळे, जगदीश जाधव, जयेश बोरसे उपस्थित होते. भोसरी येथील भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांनाही 'सनबर्न महोत्सव' रहित होण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
'सनबर्न फेस्टिव्हल'च्या विरोधात पुणे येथे रणरागिणी शाखेच्या वतीने आंदोलन ! 
     भारतीय संस्कृतीविरोधी 'सनबर्न फेस्टिव्हल'च्या विरोधात पुणे येथे हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिस्ती नववर्षानिमित्त ३१ डिसेंबरला होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधातही आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे. अधिकाधिक हिंदूंनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 
स्थळ : टिळक पुतळा, मंडई, पुणे. 
वार आणि दिनांक : १४ डिसेंबर, सोमवार 
वेळ : दुपारी ४ वाजता 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn