Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रगीत आणि एम्आयएम् !

      ‘संपूर्ण देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत लावण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरला दिला आहे आणि त्या संदर्भातील संक्षिप्त नियमावलीही घोषित केली आहे. या वेळी पडद्यावर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यात येईल आणि या कालावधीत प्रत्येकाने उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखणे बंधनकारक आहे. ‘राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहा’, असे देशभक्तांची परंपरा असणार्‍या भारतियांना आज न्यायालयाने तसे आदेश देण्याची वेळ का आली ? हे लज्जास्पद असले, तरी न्यायालयाने ते केल्यामुळे आता देशद्रोही प्रवृत्तीवर वचक रहाण्यास काही प्रमाणात साहाय्य होणार आहे.
१. राष्ट्रद्रोही प्रवृत्तींचा सुळसुळाट !
     गरम तव्यावर पाणी पडल्यावर जेवढ्या चटकन ‘चर्र ऽ र्र’ होते, तेवढ्याच तत्परतेने या राष्ट्रसन्मानाच्या आदेशावर एम्आयएम् (मजलिस इत्तेहादुल मुसलमीन)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहून राष्ट्रभक्ती जोपासली जाणार आहे का ?’, असा बुद्धीभेद करणारा प्रश्‍न ओवैसी यांनी केला आहे. राष्ट्रभक्ती ही व्यापक संकल्पना असली आणि ‘केवळ राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहाणे म्हणजे केवळ राष्ट्रभक्ती नव्हे’, असे जरी असले, तरी राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहून त्याचा सन्मान करणे, हा राष्ट्राप्रती सन्मान प्रदर्शित करण्याचा एक भाग आहे.
      एम्आयएम्चे धोरणच राष्ट्रहितैशी गोष्टींना विरोध करणारे आहे, हे इथे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. ६ मार्च २०१६ ला मुंबईतील भायखळा येथील एम्आयएम्चे आमदार वारीस पठाण यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांना विधानसभेतून अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते; एवढेच नव्हे तर विधीमंडळ परिसरात येण्यासही त्यांच्यावर बंदी घातली होती. या वेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. सर्व पक्षियांनी या विरोधात एकमताने हा ठराव संमत करून हा निर्णय घेतला. ‘मुसलमान समाजाचे देशावर तेवढेच प्रेम आहे; परंतु सरसंघचालक म्हणतात म्हणून आम्ही ‘जय हिंद’ किंवा ‘भारतमाता कि जय’ का म्हणायचे ?’ असा द्वेषमूलक प्रश्‍न एम्आयएम्चे दुसरे आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता. तत्पूर्वी २ मुसलमान मुंबईतील एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालू असतांना बसून राहिल्याने प्रेक्षकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, तेव्हा या आमदारांनी त्या राष्ट्रद्रोही मुसलमानांची बाजू उचलून धरली. जलील यांनी महापुरुषांची स्मारके उभारण्यासही विरोध केला होता. 
      राष्ट्रगीताच्या आदेशाविषयीचे ओवैसी यांनी प्रथम तोंडदेखले स्वागत करणे, हा ढोंगीपणा आहे. मागेही त्यांनी म्हटले होते की, ‘जर कायदा असेल, तर चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावायला हवे; मात्र कोणीही कायद्याचे उल्लंघन करत असेल, तर त्याला रोखण्यासाठी कायदा हातात घेऊ नये.’ याला काय अर्थ आहे ? एकंदरच काय, तर भारत राष्ट्राविषयी अस्मिता प्रदर्शित करणारे जे जे म्हणून काही आहे, त्याचे बंधन एम्आयएम्ला नको आहे.
२. एम्आयएम्ची विखारी वक्तव्ये !
      ओवैसी म्हणतात की, ‘हा आमचा देश आहे आम्ही इथेच रहाणार’, हे देशप्रेमापोटी नाही, तर त्यांना येथे त्यांचा अधिकार प्रस्थापित करायचा आहे म्हणून. त्यामुळे हा देश हिंदुबहुल असणे हीच सर्वांत मोठी त्यांना सलणारी आणि खुपणारी गोष्ट आहे. या हिंदुबहुल राष्ट्रीयतेशी एकरूप न होता, या देशाला त्यांना मुसलमानबहुल बनवायचे आहे, असे त्यांच्या वक्तव्यांवरून वाटते. हा देश हिंदुबहुल असल्याने त्यांचा हिंदुद्वेष हा नैसर्गिकरीत्या राष्ट्रद्वेषच आहे. त्यातूनच त्यांनी पुढील विधाने केली आहेत. ‘हा देश कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !’, ‘राममंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य; मात्र बाबरी मशीद नक्की उभारू !’, ‘कट्टर हिंदुत्वनिष्ठांवर लक्ष ठेवा !.’ तसेच ‘भागो हिंदू ओवैसी आया’ ही त्यांची घोषणा आहे. एवढेच नव्हे, तर १५ मिनिटांत संपूर्ण हिंदूंना नष्ट करण्यासाठी त्यांना पोलिसांनाही हटवायचे आहे, याची जाणीव हिंदूंनी सतत ठेवायला हवी. एम्आयएम् ‘इसिस’चे छुपे समर्थन करतो. मराठवाड्यातील मुसलमान तरुणांना त्याने भडकवले आहे. ‘इसिस’ला पाठिंबा देणारे एम्आयएम् हे रझाकाराचे वंशज आहेत, हे आपण विसरता कामा नये. हे एम्आयएम्चे खरे स्वरूप जनतेने आणि राजकीय पक्षांनी सातत्याने स्मरणात ठेवून त्याच्याविरुद्ध संघटित होणे आवश्यक आहे.
३. हिंदूंची जागृत व्हावे !
     नांदेड महापालिकेत सत्तेवर असलेला एम्आयएम् हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पाय पसरवत आहे. आज महाराष्ट्रात एम्आयएम् ९ ठिकाणी ३ र्‍या, ३ ठिकाणी २ र्‍या स्थानावर, तर २ ठिकाणी पूर्णतः विजयी आहे. मूळचा आंध्रप्रदेशचा हा पक्ष नांदेडसह महाराष्ट्रात ३ ठिकाणी सत्तेत येतो, यावरूनच तो किती वेगाने फोफावतो आहे, हे लक्षात येते. जिथे मुसलमानबहुलता, वाढते तेथून हिंदूंना हद्दपार व्हावे लागते, याच्या उदाहारणांची साखळी आपल्याकडे आहे. जिथे त्यांच्या हातात सत्ता येते, तिथे काय होईल, हे वेगळे सांगायला नको. ‘भागो हिंदू ओवैसी आया’ ही त्यांची घोषणा आहे. त्यामुळे आता हिंदूंनी पळून जायचे आहे कि स्वतःचे अस्तित्व टिकवायचे आहे, हे त्यांनी ठरवायला हवे. एम्आयएम्ची मान्यता रहित करण्यात यावी, अशी मागणी परभणी येथील शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी २२ जुलै या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली होती. नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्र आणि लेखापरीक्षण यांची प्रत न देणार्‍या एम्आयएम्ची मान्यता १३ जुलैला रहित करण्यात आली होती. हिंदूंच्या जीवावर उठलेल्या या पक्षाची जनमानातील मान्यता रहित होऊन आवैसींना येथून पळण्यास भाग पाडणे, हे राष्ट्रप्रेमाची धग प्रज्वलित असल्याचे लक्षण ठरणार आहे. हिंदुत्वनिष्ठांसह समस्त हिंदूंनी याची दखल घ्यावी.’
- एक राष्ट्राभिमानी नागरिक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn