Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देव भक्ताला काळाच्या दाढेतून कसे वाचवतो, याची कु. दीपाली हिच्याविषयी तिच्या सेवेतील साधिका सौ. उल्का जठार यांनी घेतलेली अनुभूती

१. २०.१०.२०१६ च्या रात्री दीपालीला पुष्कळ ताप येणे आणि तिचे डोके दुखत असल्याने लेप लावून डोके चेपून दिल्यावर तिला आराम मिळणे : २०.१०.२०१६ च्या रात्री ३ वाजता दीपालीचे डोके दुखू लागले आणि तिला पुष्कळ तापही आला. तेव्हा मी तिच्या डोक्याला लेप लावला आणि डोके चेपून दिले. त्यामुळे तिला आराम मिळाला.
२. दुसर्‍या दिवशीही रात्री ताप येणे : २१.१०.२०१६ या दिवशी दीपालीला रुग्णालयात नेले. त्या दिवशी नंतर ती थोडी बरी होती. संध्याकाळी माझ्या मनात विचार आला, ही आता बरी आहे; पण रात्री तिला ताप आला, तर काय करायचे ? कृष्णाने साधिका आधुनिक वैद्या (सौ.) काटोटेताईंना विचारून घ्यायला सुचवले. त्यांनी रात्री ताप आला, तर क्रोसिनची गोळी द्यायला सांगितले. त्याही रात्री ३ वाजता दीपालीला ताप येऊन तिचे डोके दुखू लागले. मी तिचे डोके चेपून दिले आणि तिच्या कपाळाला लेप लावला.
३. रक्त आणि लघवी यांच्या तपासणी अहवालात डेंग्यू आणि कावीळ यांचे निदान होणे : २२.१०.२०१६ या दिवशी आधुनिक वैद्या (सौ.) काटोटेताईंशी बोलणे झाले. त्यांनी दोन रुग्णालयांची नावे सांगितली; परंतु दोन्ही रुग्णालयांतील आधुनिक वैद्य गावी गेले होते. मग आधुनिक वैद्या काटोटेताईंनी त्यांच्याच चिकित्सालयात दीपालीला सलाईन लावले, तसेच तिचे रक्त आणि लघवी तपासणीसाठी दिले. संध्याकाळी ६ वाजता तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) आला. त्यात डेंग्यू आणि कावीळ यांचे निदान झाले. दीपालीला डेंग्यू झाला होता आणि कावीळची सुरुवात होती.
४. दीपालीला न्यूमोनियाही झाल्याचे तपासणीवरून कळणे आणि आधुनिक वैद्यांनी दीपालीच्या नातेवाइकांना बोलावून घेण्यास सांगणे : त्या रात्री ८ वाजता दीपालीला सीटी रुग्णालयात नेले. त्यानंतर २४ ऑक्टोबर या दिवशी दीपालीसाठी पांढर्‍या पेशींचे रक्त मिळण्यात प्रथम अडचणी आल्या; परंतु नंतर ईश्‍वराच्या कृपेने ते मिळालेे. त्याच दिवशी आधुनिक वैद्यांनी सांगितले, यांच्या नातेवाइकांना बोलावून घ्या. त्या दिवशी दुपारी दीपालीचे पोट दुखत असल्याने तिची क्ष-किरण (एक्सरे) तपासणी केली. त्यात छातीत (न्यूमोनिया) आणि पोटात पाणी झाल्याचे आढळले.
५. दीपालीताईसाठी संत नामजप करत आहेत आणि महर्षींनीही उपाय सांगितले आहेत, हे समजल्यावर गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे आणि त्यानंतर त्यांचे अस्तित्व प्रत्येक प्रसंगी जाणवू लागणे : गुरुमाऊली, दीपालीच्या संदर्भातील सर्व सेवा तुमच्या कृपेने माझ्याकडून होत होत्या; पण दीपालीची स्थिती सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना सांगतांना मी थोडी भावनाशील आणि आतून घाबरल्यासारखी झालेे होते. मी प्रार्थना करत होते. सद्गुरु ताईंनी सांगितले, काकू, संत जप करत आहेत आणि महर्षींनीही उपाय सांगितले आहेत. त्या वेळी माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली. त्यानंतर मला सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व सातत्याने जाणवू लागले.
६. दीपालीला दुसर्‍या रुग्णालयात नेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी तिची स्थिती गंभीर आहे, असे सांगणे : २४ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता आधुनिक वैद्य बच्चूवार म्हणाले, तुमच्या रुग्णाला अश्‍विनी रुग्णालयात न्यायचे आहे. त्यामुळे त्या रात्री १० वाजता दीपालीला अश्‍विनी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेमधून तेथे नेलेे. रात्री ११ वाजता तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, रुग्णाची स्थिती गंभीर आहे. आम्ही प्रयत्न करणार आहोत; पण तुम्हाला वाटले, तर तुम्ही दुसरा निर्णय घेऊ शकता. देवाने प्रत्येक प्रसंगात वर्तमानकाळात रहाता येण्यासाठी शक्ती दिली. 
७. आधुनिक वैद्यांनी दीपालीला भ्रमणभाषवर बोलायला अनुमती देणे : २५ ऑक्टोबर या दिवशी सद्गुरु बिंदाताई म्हणाल्या, काकू, मला दीपालीशी बोलायचे आहे. रात्री आधुनिक वैद्य आल्यावर मी त्यांना विचारले, दीपालीची आई (आध्यात्मिक आई) येथे येऊ शकत नाही. तिला दीपालीशी बोलायचे आहे. दीपाली बोलली नाही, तरी चालेल निदान आईचा आवाज तरी कानावर पडेल. आधुनिक वैद्यांनी याला अनुमती दिली.
८. सद्गुरु (सौ.) बिंदाताई दीपालीशी भ्रमणभाषवर बोलत असतांना अतीदक्षता विभागात लख्ख प्रकाश पडलेला जाणवणे आणि बोलणे झाल्यावर दीपालीच्या तोंडवळ्यावर तेज जाणवून आवाजातही उत्साह जाणवणे : २६ ऑक्टोबर या दिवशी दिवसभर बोलायची संधी मिळाली नाही. संध्याकाळी ६ ते ६.३० या कालावधीत बोलण्याची संधी मिळाली. सद्गुरु बिंदाताईंना भ्रमणभाष केला. त्या दीपालीशी बोलत असतांना अतीदक्षता विभागात लख्ख प्रकाश पडलेला जाणवला. आधी दीपालीचा तोंडवळा कोमेजलेला होता. सद्गुरु बिंदाताई जसजशा तिच्याशी बोलू लागल्या, तसतसे तिच्या तोंडवळ्यावर तेज जाणवायला लागले. सद्गुरु बिंदाताई दीपालीशी फारतर ५ मिनिटे बोलल्या असतील; परंतु या ५ मिनिटांत तिच्यात एवढा पालट जाणवला की, तिच्या कपाळावरील कुंकूही तेजोमय दिसू लागले. ती उत्साही वाटू लागली. मी तिला विचारले, छान वाटते ना ? तेव्हा ती हो म्हणाली. त्या वेळी तिच्या बोलण्यातही उत्साह जाणवला.
९. सद्गुरु (सौ.) बिंदाताई दीपालीशी बोलल्या, असे समजल्यावर आजपर्यंत कधीही न अनुभवलेली स्वतःची भावावस्था अनुभवता येणे : २७ ऑक्टोबर या दिवशी सद्गुरु बिंदाताई दीपालीशी बोलल्या, असे मला समजले. त्या वेळी देव भक्ताची किती काळजी घेतो, असे वाटून माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली आणि माझी भावजागृतीही झाली. माझी ही स्थिती बराच वेळ टिकून राहिली. आजवर प्रयत्न करूनही स्वतःची अशी स्थिती अनुभवायला मिळाली नव्हती.
१०. सद्गुरु (सौ.) बिंदाताई दीपालीशी भ्रमणभाषवर बोलत असतांना पुष्कळ थंडावा जाणवणे आणि आपण वैकुंठात आहोत, असे जाणवणे : २८ ऑक्टोबर या दिवशी मी सत्संगाला जाऊन आल्यावर सायंकाळी ६ वाजता रुग्णालयात गेले. कु. तृप्तीताईला विचारले, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आज दीपालीशी बोलल्या का ? ती म्हणाली, सकाळी बोलणे झाले. तेव्हा मनात विचार आला, रात्री ७ वाजता दीपाली भ्रमणभाषवरून बोलली, तर चालेल का ? हे परिचारिकेला विचारूया. तिने याला अनुमती दिली. त्यानंतर सद्गुरु बिंदाताई भ्रमणभाषवरून दीपालीशी ८ - ९ मिनिटे बोलल्या. त्या बोलत असतांना मला आणि दीपालीलाही गेल्या २ दिवसांच्या तुलनेत आज थंडावा अधिक जाणवला. त्यांचे बोलणे झाल्यावर मला २ सेकंद काही भानच नव्हते. मी दीपालीला म्हणाले, प.पू. डॉक्टरांनी आपल्याला वैकुंठात नेले. दीपाली म्हणाली, हो काकू. मलाही असेच जाणवले. गुरुमाऊली, सद्गुरु बिंदाताईंच्या रूपात येऊन तुम्ही अनुभूती दिल्या. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्प आहे.
११. आधुनिक वैद्यांनी दीपालीच्या स्थितीविषयी सांगितलेले सद्गुरु बिंदाताईंना व्यवस्थित सांगता येण्यासाठी रुग्णालयात आधुनिक वैद्या काटोटेताईंनी यावे, असे वाटणे आणि त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी प्रतिदिन रुग्णालयात येऊन सद्गुरु बिंदाताईंना दीपालीच्या स्थितीविषयी सांगणे : माझ्या मनात विचार यायचा, आधुनिक वैद्य जे सांगतात, ते सद्गुरु बिंदाताईंना व्यवस्थित सांगता यायला हवे. त्यासाठी याच व्यवसायातील व्यक्ती असायला पाहिजे. प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून आधुनिक वैद्या काटोटेताईंचेे नाव सुचवले. मी काटोटेताईंना म्हणाले, ताई, दिवसभरातून तुम्हाला कधीही वेळ मिळाला की, रुग्णालयात या. त्या हो म्हणाल्या. त्या रुग्णालयात येऊन धारिका बघायच्या आणि मला सांगायच्या. मी त्यांना म्हणाले, ताई, तुम्ही आता मला जे सांगितले, ते तुम्ही सद्गुरु बिंदाताईंना सांगता का ? त्या म्हणाल्या, मी कधी त्यांच्याशी बोलले नाही; पण प्रयत्न करते. त्यानंतर त्या सकाळी आणि संध्याकाळी आधुनिक वैद्य रुग्णालयात फेरी मारतांना यायच्या आणि त्यांनी दीपालीविषयी सांगितलेले सद्गुरु बिंदाताईंना सांगायच्या. देव आपल्या सेवेत कुणाच्यातरी रूपात येऊन किती साहाय्य करतो !
१२. आधुनिक वैद्या काटोटेताईंकडे पंचकर्म करण्यासाठी रुग्ण येत असूनही त्या सकाळी आणि रात्रीही रुग्णालयात येत असणे : खरेतर काटोटेताईंकडे पंचकर्म करण्यासाठी रुग्ण येतात. त्या सकाळी चिकित्सालय बंद करून १०.३० वाजता दीपालीसाठी रुग्णालयात यायच्या आणि रात्रीही येऊन सद्गुरु बिंदाताईंना दीपालीच्या प्रकृतीविषयी सांगायच्या. गुरुमाऊली, तुम्हीच त्यांच्यात तळमळ निर्माण केलीत आणि त्यांच्याकडून साधना करवून घेतलीत. गुरुमाऊली, या कालावधीत तुम्ही आम्हा सर्व साधकांची मने जुळवली होती आणि आमच्यातील शरणागतीही वाढवली होती.
१३. दीपालीच्या जिवारील संकट दूर होण्यासाठी केलेल्या आध्यात्मिक उपायासंदर्भातील अनुभूती
१३ अ. पिशवीत असलेल्या आध्यात्मिक उपायांच्या वस्तूंना दीपालीच्या हाताचा स्पर्श केल्यावर ती पिशवी जड झाल्याचे जाणवणे : २९.१०.२०१६ या दिवशी सद्गुरु बिंदाताईंनी महर्षींचा निरोप दिला, आध्यात्मिक उपाय म्हणून गहू, ५ नाणी आणि हिरवे गवत या वस्तूंना दीपालीचा हात लावून त्यांतील हिरवे गवत गायीला द्यायचे अन् उर्वरित २ वस्तू दान करायच्या आहेत. हे करण्यासाठी मी पिशवीत हे साहित्य घेऊन दीपालीकडे गेले. तिचा सर्व वस्तूंना हात लावून अतीदक्षता विभागातून बाहेर आले. बाहेर येतांना माझ्या हातातील ती पिशवी मला जड वाटू लागली. मला पिशवी आत घेऊन जातांना काही जाणवले नाही; पण दीपालीच्या हाताच्या स्पर्श झाल्यानंतरचा जडपणा वेगळाच जाणवला.
१४. भगवंतच खरे प्रेम करत असतो, हे लक्षात येणे : गुरुमाऊली, आई-वडीलही पोटच्या लेकरासाठी एवढे करणार नाहीत, तेवढे आपण दीपालीसाठी केले. भगवंतच खरे प्रेम करत असतो, हे आपण यातून शिकवले. मनात विचार यायचा, गुरुमाऊलीला, भगवंताला देह जरी अर्पण केला, तरी अल्प आहे.
१५. साधकांची काळजी कशी घ्यावी ?, हे गुरुमाऊलीने शिकवणे : गुरुमाऊली, मला सद्गुरु बिंदाताईरूपी मायमाऊलीला दीपालीची स्थिती दिवसातून २ वेळा भ्रमणभाषवरून कळवण्याची सेवा दिली होती. भ्रमणभाष करता क्षणी तो पटकन उचललेला असायचा. त्या आधुनिक वैद्यांनी सांगितलेले सवर्र् शांतपणे ऐकून घेत होत्या. त्या आम्हाला दिलासा देत होत्या. सद्गुरु बिंदाताई म्हणाल्या, काकू, तुम्ही आधुनिक वैद्य जी वेळ देतील, त्या वेळेत कधीही भ्रमणभाष करा. माझ्या वेळेचा विचार करू नका. भ्रमणभाष चालू असतांना आधुनिक वैद्य आले, तर वेळ आणि प्रसंग बघून तुम्ही माझा भ्रमणभाष कट करू शकता. त्यांचे दोन शब्द कानावर पडले, तरी पुरेसे आहेत. गुरुमाऊली, साधकांची काळजी कशी घ्यावी ?, ते तुम्ही या प्रसंगातून शिकवले. तसेच गुरु मृत्यूयोग कसा टाळू शकतात आणि देव काळाच्या दाढेतून कसा वाचवतो, हेही या प्रसंगातून लक्षात आले.
- सौ. उल्का जठार, सोलापूर 
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn