Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी पुढे ढकलण्याचा सीबीआयचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला !

पुढील सुनावणी 
३ जानेवारी २०१७ ला होणार
       पुणे, २३ डिसेंबर - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी १ मास पुढे ढकलावी; कारण आरोपनिश्‍चिती करण्यासंबंधी जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे, असा विनंती अर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला. अपर सत्र न्यायाधीश एम्. नासीर यांनी हा अर्ज फेटाळून लावत आरोप निश्‍चितीची पुढील सुनावणी ३ जानेवारी २०१७ या दिवशी ठेवली आहे. (यावरूनच अन्वेषण यंत्रणेचा चालढकलपणाच दिसून येतो ! संपादक) यापूर्वीही अन्वेषण यंत्रणेने ‘आरोप निश्‍चितीची सुनावणी पुढे ढकलावी’, असे अर्ज १६ आणि २८ नोव्हेंबर, तसेच ९ डिसेंबर २०१६ या दिवशीही केले होते. प्रत्येक वेळी न्यायालयाने ते अर्ज फेटाळून लावत यंत्रणेला संधी दिली होती. या वेळी डॉ. तावडे यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अन्वेषण यंत्रणेचे अधिवक्ता मनोज चालाडे हे उपस्थित होते. सुनावणीला डॉ. तावडे यांना उपस्थित करण्यात आले नव्हते.
       खटल्याच्या सुनावणी वेळी डॉ. तावडे यांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात कागदपत्रे सादर करण्याविषयीचा एक अर्ज सादर केला. त्या अर्जामध्ये म्हटले आहे की,
१. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी तपास केला होता. त्या तपासामध्ये डॉ. दाभोलकर यांच्या विरोधात काही तक्रारी करण्यात आल्याचे आढळून आले होते.
       त्या तक्रारी साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा यांच्याकडे दाखलही करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निष्कर्ष पुणे पोलिसांनी काढला होता.
२. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेनेही हा तपास तसाच पुढे नेला. त्यामुळे न्यायालयासमोर सत्य येण्यासाठी पुणे पोलिसांनी काय तपास केला ? ‘तक्रारीत तथ्य नाही’, असा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढून तो तपास बंद केला. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबर यांना यासंदर्भातील आवश्यक ज्ञान आहे का ? असे अनेक प्रश्‍न यामध्ये उपस्थित होतात. त्यामुळे ती कागदपत्रे न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे; म्हणून अन्वेषण यंत्रणेने ती कागदपत्रे न्यायालयासमोर उपस्थित करावीत, असे निर्देश न्यायालयाने त्यांना द्यावेत.
३. यावर अन्वेषण यंत्रणेने त्यांचे म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn