Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रत्यक्ष साधनेत नसतांनाही साधकांसाठी गुरुतत्त्व कसे कार्य करते ? यासंदर्भात जाणवलेली सूत्रे

श्री. व्यंकटेश अय्यंगार
    वर्ष १९९० मध्ये सनातन संस्थेची (सनातन भारतीय संस्कृती संस्था) स्थापना झाली. त्या वेळी मला संस्थेविषयी काही ठाऊक नव्हते. तरीही गुरुतत्त्व कसे योग्य मार्गदर्शन करते, हे दर्शवणारा एक प्रसंग आठवला.
१. चोरून नक्कल करणे (कॉपी) या दुष्कृत्याविरुद्ध
ठोस पावले उचलल्याने प्रशासकाने त्यागपत्र देण्यास सांगणे
    मी कर्नाटक राज्याच्या एका महाविद्यालयामध्ये अध्यापक (लेक्चरर) या पदावर सेवारत होतो. ती खाजगी प्रशासक संस्था (प्रायव्हेट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन) होती. परीक्षेमध्ये विद्यार्थी चोरून नक्कल (कॉपी) करत असतांना त्यांच्या या दुष्कृत्याविरुद्ध मी ठोस पावले उचलली. त्यामुळे मुख्य प्रशासकाने मला त्यागपत्र (राजीनामा) देण्यास सांगितले. माझ्या इतर सहकार्‍यांचा मला पाठिंबा न मिळाल्यामुळे मी त्यागपत्र दिले.       
२. आर्थिक अडचणही पुष्कळ होत्या, तरीही बारमधील
चांगल्या पगाराची चाकरी स्वीकारण्यास नकार देणे
    एकदा बार आणि रेस्टॉरंट या उपाहारगृहाच्या मालकाने त्याच्या उपाहारगृहात कोशपाल (कॅशियर) ही जागा मला देऊ केली होती. ते प्रती मास मला १०,००० रुपये द्यायला सिद्ध होते. (महाविद्यालयामध्ये मला केवळ १,६४५ रुपये मिळत होते.) घरात आर्थिक अडचणही पुष्कळ होती. माझ्याविना कमावणारे कुणीही नव्हते. मी मालकाला सांगितले, मी मुलांना सिगारेट ओढू नका, दारू (नशा) पिऊ नका इत्यादी सांगतो. त्यांच्यात चांगले संस्कार रुजवण्यासाठी, चांगले गुण येण्यासाठी अन् ते चांगला नागरिक बनावेत यासाठी प्रयत्न करत आहे, तर तुम्ही मला बारमध्ये चाकरी देऊन माझ्या प्रयत्नांवर पाणी फिरवत आहात ! मी ती चाकरी स्वीकारली नाही.
३. गुरुतत्त्वानेच योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने जिवंत रहाणे
    आता माझ्या लक्षात आले, तेव्हा गुरुतत्त्वानेच मला योग्य मार्गदर्शन केले आणि माझ्याकडून योग्य कृती करवून घेतली. गुरुदेव, मी धन्य आहे. तुमच्या चरणकमली स्थित होऊन निश्‍चिंत, सुरक्षित आणि निर्भय आहे. निर्मळ होण्याचा आणि सतत तुमच्या चरणांची सेवा करण्यासाठी सिद्ध होण्याचा, निरपेक्ष बनण्याचा आणि निर्गुण तत्त्व अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुदेवा , तुमच्या कृपाशीर्वादावरच जिवंत आहे.
    प.पू. गुरुदेवांच्या कृपेने हे विचार ग्रहण करता आले; म्हणून त्यांच्याच चरणी अर्पण करून कृतार्थ होत आहे. 
    - श्री. व्यंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(४.८.२०१६)
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn