Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मध्यप्रदेश राज्याचा प्रसारकार्याचा आढावा

१. नोव्हेंबर मासात सनातन संस्थेच्या वतीने इंदूर 
(मध्यप्रदेश) येथे लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद 
     ‘इंदूर येथे ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘मुक्त संवाद’ संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. अनेकांनी हे ग्रंथ अन्य ग्रंथांपेक्षा वेगळे आहेत, अशा शब्दांत ग्रंथांचे कौतुक केले. हे ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी मुक्त संवाद या संस्थेचे सदस्य श्री. मोहन रेडगांवकर यांचे सहकार्य लाभले.
२. इंदूर (मध्यप्रदेश) येथे गोभक्त बलीदान स्मरण 
समितीच्या मौन रॅलीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
     ‘७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी नवी देहली येथे गोभक्त आणि संत यांनी गोरक्षणासाठी बलीदान दिले होते. त्यांच्या ५० व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने इंदूर (मध्यप्रदेश) येथे ७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘गोभक्त बलीदान स्मरण समिती’च्या वतीने मौन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. बेनीसिंह रघुवंशी यांनी सहभाग घेतला.’
- श्री. योगेश व्हनमारे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मध्यप्रदेश.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn