Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आत्मोद्धार आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी श्री भगवद्गीतेचा नियमित अभ्यास करावा ! - प्रभु नरसिंहा लीलादासजी, इस्कॉन

उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना प्रभू नरसिंहा लीलादासजी
   कोपरखैरणे (नवी मुंबई), १३ डिसेंबर (वार्ता.) - आजचा तरुण पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे व्यसन, मांसाहार आणि वासना यांच्या आहारी जाऊन दिशाहीन झाला आहे. अशा दिशाहीन तरुणांना भगवद्गीता जीवनाचा योग्य मार्ग दाखवू शकते. आत्मोद्धार आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी श्री भगवद्गीतेचा नियमित अभ्यास करावा, असे मार्गदर्शन इस्कॉनचे प्रभु नरसिंहा लीलादासजी यांनी गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. ‘नवी मुंबई हिंदू ब्रेन्स’ यांच्या वतीने कोपरखैरणे, सेक्टर १९ मधील ग्रामदेवता श्री रांजनदेवी मंदिराच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी प्रेरणामंत्र आणि गीतेच्या ‘पुरुषोत्तमयोग’ हा १५ व्या अध्यायाचे गायन करण्यात आले. सूत्रसंचालक श्री. मंगेश म्हात्रे यांनी गीता जयंती साजरी करण्यामागील हेतू सांगितला. कार्यक्रमाच्या शेवटी ध्येयमंत्र म्हणण्यात आला. या वेळी ‘नवी मुंबई हिंदू ब्रेन्स’चे ४५ कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी इस्कॉनच्या वतीने श्री भगवद्गीतेचे आणि सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
   ते पुढे म्हणाले, ‘‘विस्तीर्ण वृक्षाची पाळे-मुळे सखोल नसल्यास तो वादळात उन्मळून पडतो; मात्र ज्याची पाळे-मुळेे खोलवर रुजली आहेत, असा लहान वृक्षही वादळात टिकतो. त्याप्रमाणे धर्माभिमानी हिंदूंनी कार्य वाढवतांना आपली साधना आणि चारित्र्यरूपी पाळे-मुळेे घट्ट बनवावीत.’’ 
क्षणचित्र : कु. सेजल कणसे या लहान विद्यार्थीनीने प्रेरणा मंत्र म्हणायला सुरूवात केल्यानंतर सर्व कार्यकर्ते आणि धर्माभिमानी स्वत:हून उठून उभे राहिले .

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn