Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती

सौ. मीरा माने
१. यज्ञकुंडाभोवती देवीच्या अस्त्रांची रांगोळी 
काढतांना त्यातून सुटलेला प्रत्येक बाण स्वतःतील दोषांना 
लागून दोष नष्ट होत असल्याचे जाणवणे आणि मन सकारात्मक होणे 
     नवरात्रीच्या दिवसांत रामनाथी आश्रमात नवचंडी याग करण्यात येणार होता. त्या वेळी मला यज्ञकुंडाभोवती देवीच्या अस्त्रांची रांगोळी काढण्याची संधी मिळाली होती. तेव्हा यज्ञकुंडाच्या तीन बाजूंनी रांगोळी काढत असतांना मला फार चांगले वाटत होते. रांगोळीत रंग भरतांना आतून आपोआप प्रार्थना झाली, हे देवी, तू या बाणांनी असुरांचा नाश केलास, तसेच हे बाण माझ्यातील अनेक जन्मांचे दोष आणि अहं यांना लागून ते मुळासकट नष्ट होऊदे. अशी प्रार्थना झाल्यावर प्रत्येक बाण त्या त्या दोषावर लागत आहे आणि देवी त्यांना नष्ट करण्याची शक्ती देत आहे, असे जाणवत होते. त्या वेळी मनात दोषांमुळे आलेली नकारात्मता अल्प होऊन मन सकारात्मक झाले.
२. डोळे मिटल्यावर देवीचे विशाल रूप दिसून मन निर्विचार होणे 
     नवव्या दिवशी संध्याकाळी देवीचे स्तुती-श्‍लोक चालू असतांना डोळे मिटल्यावर विशाल रूपात देवीचे अस्तित्व जाणवून भाव जागृत होत होता. त्या वेळी देवीच्या हातात असलेले त्रिशूळ स्पष्ट दिसत होते. नंतर देवीचा डावा चरण दिसू लागला. तो इतका स्पष्ट दिसत होता की, मी केवळ तो चरणच पहात होते. मला सभोवताली काय चालले आहे, याचे भान नव्हते. मनात कोणतेच विचार नव्हते. देवीचे चरण, त्यावरील मेंदीचा गोल, तिने घातलेले पैंजण आणि तिच्या साडीचा काठ सर्व फारच विलक्षण दिसत होते.
     यज्ञस्थळी प्रत्यक्ष देवीचे अस्तित्व असल्यामुळे आणि प.पू. गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे ही भाव स्थिती अनुभवता आली, यासाठी मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. 
- सौ. मीरा माने, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn