Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नाताळ साजरा करणे, ही हिंदूंची अतिसहिष्णुताच !

डिसेंबरमध्ये नाताळ हा ख्रिस्त्यांचा सण येतो. सध्या हिंदूदेखील हा सण साजरा करण्यात गुरफटले आहेत. नाताळच्या निमित्ताने हिंदूंची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून हे एकप्रकारे धर्मांतरच आहे. हिंदूंना धर्मशास्त्राचे पालन करणे मागासलेपणाचे वाटते, तर सांता क्लॉसच्या भाकड कथा ऐकणे आणि त्या अनुसरणे पुढारलेपणाचे वाटते, हे दुर्दैवी नव्हे का ?
पुरोगामी आणि राजकीय नेते यांचा ढोंगीपणा 
   ‘हिंदूंच्या त्या अंधश्रद्धा आणि अन्य पंथियांच्या त्या श्रद्धा’ अशी सध्या मानसिकता आहे. एरव्ही देवळात देवाला फुले, दूध अर्पण करण्यास प्रतिबंध करणारे पुरो(अधो)गामी ठिकठिकाणी भेटतील. नाताळच्या नावाने खाद्यपदार्थ, सजावट यांवर होणार्‍या अनाठायी खर्चाविषयी मात्र ते मूग गिळून गप्प असतात. हिंदूंच्या प्रत्येक परंपरेला वैज्ञानिक आणि धर्मशास्त्रीय आधार असूनही त्याचा अभ्यास करण्यासाठी नीरस असणारे पुरो(अधो)गामी ‘सांता क्लॉस’सारख्या तर्कहीन संकल्पनांना विरोध करायला पुढे सरसावत नाहीत. 
   गेल्या वर्षी सरकारने नाताळनिमित्त २ लाख ख्रिस्त्यांना कपडे वाटले. हा सण जर सर्वांचाच आहे, तर हिंदूंना यात सहभागी का केले नाही ? हिंदूंच्या सणांच्या दिवशी असा उपक्रम राबवल्याचे कधी ऐकिवात नाही. यातून राजकीय नेत्यांचा सर्वधर्मसमभावाविषयीचा ढोंगीपणाच समोर येतो. 
नाताळ म्हणजे वायफळ खर्च आणि रोगांना निमंत्रण
   ख्रिसमस ट्री उभारणे हे भयंकर रोगांना निमंत्रण देण्यासारखे आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या अपस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनातून हे समोर आले आहे. अनेक दिवस घरात ठेवलेल्या ख्रिसमस ट्री वरील जिवाणूंमुळे खोकला, श्‍वसनाचे रोग उदा. ब्राँकाइटीस, न्यूमोनिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. शिवाय या झाडांचा पर्यावरण आणि मानव यांना काही एक उपयोग नाही. त्यांची देखभाल करण्यात वेळ वाया जातो. त्यामुळे ख्रिसमस ट्री उभारणे म्हणजे स्वत:हून स्वत:चे आरोग्य धोक्यात घालणे आणि वेळ अन् पैसा वाया घालवणे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. केक कापल्याशिवाय ख्रिसमस साजरा होत नाही, अशी ख्रिस्त्यांंमध्ये समजूत आहे. ख्रिसमस साजरा करण्यासाठी सध्याच्या महागाईच्या काळात यावर खर्च करावा लागतो. शिवाय सजावटीचे साहित्य, भेटवस्तू, शुभेच्छापत्र यांवरही खर्च करणे ओघाने येतेच. ख्रिसमसच्या रात्री प्रसाद म्हणून मद्यप्राशन करतात. बाजारपेठांमध्ये या वस्तूंचे मूल्य भरमसाट असले तरी ख्रिसमस साजरा करायचा तर या वस्तू खरेदी करणे भागच असते. या दिवसांत लोकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होते. या दिवशी ऑनलाइन विक्री करणारी बहुतांश आस्थापने ही ख्रिश्‍चनांचीच असतात. एवढे सर्व असूनही हिंदू वेडगळपणाने या आर्थिक आक्रमणास बळी पडतात. 
हिंदूंनी धर्माभिमान जोपासण्यासह भगवंताची भक्ती करणे आवश्यक !
   रक्षाबंधनानंतर हिंदु मुलांना बांधलेल्या राख्या फेकून देणार्‍या ख्रिस्त्यांचा सण हिंदू उत्साहाने साजरा करतात, ही हिंदूंची अतिसहिष्णुताच म्हणावी लागेल. खरेतर हिंदु मासांप्रमाणे साधारणपणे मार्गशीर्ष मासात नाताळ येतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत ‘महिन्यांमध्ये मार्गशीर्ष म्हणजे मी आहे,’ असे सांगितले आहे. या मासात भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने हिंदूंनी अधिकाधिक भक्ती करणे अपेक्षित आहे. येणार्‍या आपत्काळात तरून जाण्यासाठी धर्माभिमान जोपासण्यासह भगवंताची भक्ती केल्याविना पर्याय नाही !
- कु. प्राजक्ता धोतमल, मुंबई
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn