Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबरपर्यत हस्तलिखित सातबारा पुन्हा चालू करणार ! - चंद्रकांत पाटील

३१ मार्चपर्यंत ‘फायबर कनेक्टीव्हिटी’ने राज्यातील ग्रामपंचायती जोडणार !
    नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - ‘ऑनलाईन सातबारा’ प्रक्रियेत जोपर्यर्ंत सर्व त्रुटी पूर्णपणे दुरुस्त होत नाहीत, तोपर्यर्ंत सातबारा लिखित स्वरूपात देण्यात येईल. ३१ मार्चपर्यंत ‘फायबर कनेक्टीव्हिटी’ने राज्यातील ग्रामपंचायती जोडण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत १५ डिसेंबर या दिवशी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्‍नावर ते बोलत होते.     या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यशासनाने ‘ऑनलाईन सातबारा’ देण्याची घोषणा केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गेल्या ६ मासांत तलाठ्यांनी तीन वेळा आंदोलन केले. राज्य शासनाने जरी हस्तलिखित स्वरूपात सातबारा देण्याचे बंद केले होते; मात्र ‘ऑनलाईन सातबारा’ देण्यासाठी ‘सर्व्हर’ अद्ययावत नसल्याने कित्येक गावात यंत्रणेची जोडणीच झालेली नाही. त्यामुळे सात-बारा मिळण्यासाठी आणि देण्यासाठी येणार्‍या अडचणी तलाठी आणि शेतकरी या दोघांना येत आहेत. त्यामुळेच तलाठी आणि मंडल अधिकार्‍यांना बरेचदा शेतकर्‍यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. शासन शेतकरी यांच्या समस्येवर शासन गंभीरपणे काम करत नाही. या लक्षवेधीवर सभागृहात विरोधकांनी आक्रमकपणे हस्तलिखित सातबारा देण्याची मागणी केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn