Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन-निर्मित ‘दत्ताची सात्त्विक नामजप-पट्टी’

     
     सात्त्विक अक्षरांमध्ये चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांनी युक्त असलेल्या त्या त्या देवतेच्या नामजप-पट्ट्या सनातन बनवते. त्यांच्यात संबंधित देवतेचे तत्त्व सरासरी १० टक्के आले आहे. संबंधित देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट आणि प्रक्षेपित करू शकतील, असा प्रयत्न त्या बनवतांना केला जातो. दत्तासहित विविध देवतांच्या ८० हून अधिक नामजप-पट्ट्या सनातनने बनवल्या आहेत. 

१. सनातन-निर्मित दत्ताच्या नामजप-पट्टीमधील अक्षरे ही संतांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध केलेली असल्याने तिच्यात अधिक प्रमाणात चैतन्य आकृष्ट होत असल्याचे जाणवते. 
२. देवतेचे रूप, नाम दाखवल्यामुळे सगुण-निर्गुण स्तरावर लाभ होतो. 
३. तिच्यात देवतेच्या तारक आणि मारक तत्त्वे सामावलेली असतात. त्यामुळे प्रत्येकाला आवश्यक तत्त्वाचा लाभ होतो. 
४. नामजप-पट्टीचे सूक्ष्म-चित्र काढतांना नामजप ऐकू येतो आणि नंतर देवतेचे रूप दिसते. काही वेळा देवतेचे रूप दिसते अन् नंतर नामजप ऐकू येतो; परंतु दत्ताच्या नामजप-पट्टीत देवतेचे रूप दिसले आणि नामजपही ऐकू आला. 
५. दत्तामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवता अन् त्यांची शक्ती सामावलेली आहे. त्यामुळे पूर्वजांच्या त्रासाचे लगेचच निवारण होऊन कुटुंबाला लाभ होतो.’ - कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn