Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धर्माभिमान्यांच्या बैठकीत वाद घालणार्‍या हिंदुद्रोही संघटनेच्या २ कार्यकर्त्यांची शिवसेनेचे डॉ. अनिल पाटील यांनी केली कानउघाडणी !

हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांना परखडपणे सुनावणारे डॉ. पाटील यांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदु धर्माची शक्ती !
     कोल्हापूर - शहरात ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने एके ठिकाणी आयोजित केलेल्या धर्माभिमान्यांच्या बैठकीनंतर एका धर्मद्रोही संघटनेच्या २ कार्यकर्त्यांनी "तुम्ही मुसलमानांच्या विरोधात का बोलता", असे म्हणून सनातन संस्थेच्या साधकाशी वाद घातला. या वेळी शिवसेनेचे करवीर उपतालुका प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी त्या दोन कार्यकर्त्यांची कानउघाडणी करून त्यांना खडेबोल सुनावल्यानंतर ते दोन्ही कार्यकर्ते निघून गेले. (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत सिद्ध झालेले शिवसैनिक धर्महानी रोखण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, याचे हे उदाहरण होय ! - संपादक) 

१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील विविध गावांत धर्माभिमान्यांच्या बैठका घेऊन सभेला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
२. २७ नोव्हेंबर या दिवशी धर्माभिमान्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. अनिल पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सनातन संस्थेच्या साधकाने धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. ही बैठक संपल्यानंतर हिंदुद्रोही संघटनेचे दोन कार्यकर्ते साधकाजवळ येऊन तुम्हाला प्रश्‍न विचारायचे आहेत , असे म्हणाले. 
३. साधकाने 'तुम्ही बाजूला या. आपण बोलूया', असे त्यांना सांगितले. त्यानंतर ते कार्यकर्ते म्हणाले, "आम्हाला सर्वांसमोर प्रश्‍न विचारायचे आहेत." त्या वेळी साधकाने, "मला तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायची नाहीत", असे परखडपणे सांगितले. या वेळी तेथे डॉ. अनिल पाटील आले. या सूत्रावरून डॉ. पाटील आणि हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक वाद झाला. 
४. ते कार्यकर्ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. मुसलमान सुलतानाकडेही हिंदू होते. मग तुम्ही मुसलमान आणि हिंदू यांच्यात वाद का घालता ?" (शिवाजी महाराजांच्या सैन्यात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे मुसलमान होतेे. धर्मांधांप्रमाणे ते हिंदूंच्या जिवावर उठलेले नव्हते, तर मुसलमान आक्रमणकर्त्यांच्या विरोधात लढत होते ! - संपादक) 
५. साधकाने त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. तेव्हा साधकानेे, "तुम्हाला हिंदु धर्माचे एवढे वावडे आहे, तर तुम्ही इस्लाम धर्म का स्वीकारत नाही ?", असे विचारले. 
६. या वेळी साधकाने उपस्थित सर्व धर्माभिमान्यांना सांगितले, 'ही धर्मद्रोही संघटना छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारल्याचा खोटा इतिहास सांगून हिंदूंमध्ये फूट पाडत आहे'. तेव्हा ते हिंदुद्रोही संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, "आम्ही असे म्हणत नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना मारण्यासाठी ब्राह्मणांनी साहाय्य केले, असे म्हणतो". 
७. त्यानंतर डॉ. अनिल पाटील म्हणाले , "या हिंदुद्रोही संघटनेचा एकही कार्यक्रम या गावात अथवा भागात होऊ देणार नाही". त्यानंतर आणखी ३ - ४ धर्माभिमानी हिंदुद्रोही संघटनेच्या विरोधात बोलू लागले. त्यानंतर वैतागून ते दोन कार्यकर्ते तेथून निघून गेले.
      हिंदुद्रोही संघटनेचे दोन कार्यकर्ते वाद घालत असतांना तेथे २० - २५ जण उभे होते; मात्र त्यातील ३-४ धर्माभिमानीच डॉ. पाटील यांच्या बाजूने बोलत होते. (हिंदू संघटित नसल्यामुळे धर्मद्रोह्यांचे फावते ! हिंदूंनी संघटित होऊन धर्मद्रोह्यांशी वैचारिक पातळीवर लढले पाहिजे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn