Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. डॉक्टरांवर निस्सीम श्रद्धा असणारी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मृदुला विजय झोडे (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मृदुला विजय झोडे एक दैवी बालक आहे !
कु. मृदुला झोडे
     (कु. मृदुला हिची वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ६२ टक्के आहे.) 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
      मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी (७.१२.२०१६) या दिवशी स्वित्झर्लंड येथील कु. मृदुला झोडे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
कु. मृदुला झोडे हिला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. चार वर्षांची असतांना आध्यात्मिक स्तर ६१ टक्के असल्याचे घोषित 
झाल्यानंतर एका वर्षात अकस्मात् चिडचिड करणे आणि हट्टीपणा वाढल्याचे जाणवणे
     ‘१.१२.२०१४ या दिवशी कु. मृदुलाचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के असल्याची माहिती दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी ती चार वर्षांची होती. त्यानंतरच्या एका वर्षात तिच्या स्वभावात अकस्मात् पालट झालेला जाणवला. या कालावधीत ती नेहमीचे बोलतांनाही चिडचिड करत बोलत असे. संध्याकाळी ‘शुभं करोती’ म्हणायला सांगितल्यावर ‘ते म्हणायला अवघड आहे’, असे सांगून म्हणायला नकार द्यायची. तिचा हट्टीपणा वाढला होता. ‘कोणतीही गोष्ट मनाप्रमाणे व्हायला हवी’, यासाठी ती लगेच रडायची. तेव्हा मी तिला रागवायचे. 
२. तिच्यातील पालटामागे विदेशातील वातावरण, दूरचित्रवाणी 
अती पहाणे आणि मैत्रिणींसारखे वागणे ही कारणे असल्याचे लक्षात येेणे 
     तिच्या वागण्यातील हा पालट तिने अती दूरचित्रवाणी पाहिल्यामुळेे, विदेशातील वातावरणामुळे आणि तिच्या मैत्रिणींसारखे वागणे, यांमुळे झाला होता. हे आमच्या लक्षात आले. तेव्हापासून मी तिला रागावणे आणि बळजोरी करणे बंद केले आणि या सर्व अयोग्य गोष्टींचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
३. केवळ सात्त्विक कार्यक्रम दाखवायला आरंभ 
केल्यावर त्याचे सकारात्मक परिणाम जाणवणे
      तिला आम्ही कु. मोक्षदा (कु. मोक्षदा कोनेकर हीसुद्धा एक दैवी बालक आहे. - संकलक) या बालसाधिकेशी वार्तालाप यांसारखे सात्त्विक कार्यक्रम दाखवायचो. याचा योग्य तो परिणाम होऊन तिच्यात सकारात्मक पालट व्हायला आरंभ झाला.
४. वयाच्या चौथ्या वर्षापासून पाचव्या वर्षापर्यंतच्या एका वर्षात कु. मृदुला 
हिच्यात जाणवलेले सकारात्मक पालट आणि तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये 
४ अ. प्रेमभाव निर्माण झाल्याचे जाणवणे : ‘आता तिच्यात पुष्कळ प्रेमभाव आणि आपुलकी निर्माण झाली आहे’, असे जाणवते. एखाद्याने दिलेली गोष्ट जरी तिला आवडली नसेल, तरीही ती घेते आणि वापरते.
४ आ. वागण्यात मोकळेपणा येणे : तिच्या स्वभावात पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणा आला आहे. आता ती सर्वांमध्ये मिसळते.
४ इ. देवाची आवड
१. ती देवाला नेहमी साष्टांग दंडवत घालते. 
२. कोणताही खेळ खेळतांना ती ‘दिगंबरा दिगंबरा’, ‘जय जय राम कृष्ण हरि’, ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे’, असे सतत देवाचे नाव घेत गुणगुणत असते. 
३. ती घरातील झाडे, खेळणी अशा अनेक निर्जीव वस्तूंंशी बोलत रहाते. शाळेत जातांनाही झाडांना सांगून जाते.
४ ई. सात्त्विकतेची आणि धर्माचरणाची आवड 
१. सकाळी झोपेतून उठायला सांगितल्यावर लगेच उठते आणि मला ‘सूर्यदादा आले का ?’, असे विचारते. नंतर स्वतः उठून खिडकीतून सूर्य आणि श्रीकृष्ण यांना नमस्कार करते.
२. शाळेत दुसर्‍या दिवशी घालायचे कपडे आधीच काढून ठेवते.
३. शाळेत जातांना अत्तर आणि विभूती लावते. 
४. ती प्रतिदिन आम्हाला दोघांनाही नमस्कार करते. तिचे बाबा ‘नको’ म्हणत असतांनाही तिच्या पाठीवर बाबांनी हात ठेवेपर्यंत ती नमस्काराच्या स्थितीत रहाते.
४ उ. तिचे मित्र आणि मैत्रिणी तेलगू, तामिळ, जर्मन, डॅनिश, अशा कोणत्याही भाषेत बोलले, तरी ते तिला कळते.
४ ऊ. भारतात पोचल्यावर आनंद होणे आणि उत्स्फूर्तपणे ‘ॐ’ चा नामजप करू लागणे : आम्ही नोव्हेंबर २०१५ मध्ये विदेशातून मुंबईच्या विमानतळावर पोचल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला. ती मोकळा श्‍वास घेऊन उत्स्फूर्तपणे म्हणाली, ‘‘इथे किती छान वाटते ! आता आपण प्रार्थना करूया.’’ प्रार्थनेनंतर ती आनंदाने बागडत मोठ्याने ‘ॐ’ चा नामजप करायला लागली. ही माझ्यासाठी अनुभूती होती; कारण मी तिला कधीच ‘ॐ’ हा नामजप शिकवला नव्हता.
४ ए. ती प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेले बोधचित्र माझ्याकडून समजावून घेते आणि दैनिकही वाचून घेते. 
ऐ. गायींच्या हत्येविषयी चीड असणे : गायीची हत्या झाल्याचे कळताच तिला पुष्कळ वाईट वाटते. ‘गाय आपली आई आहे आणि आपण तिची पूजा करतो, तर हे लोक तिला का मारतात ?’, असे ती मला विचारते. 
४ ओ. कृष्णावरील भक्तीत न्हाऊन निघणारी मृदुला ! 
४ ओ १. तिची श्रीकृष्णावरची श्रद्धा वाढल्याचे जाणवते.
४ ओ २. शाळेतही श्रीकृष्णाशी बोलणे : ती श्रीकृष्णाला सांगूनच शाळेत जाते. तिला शाळेतही श्रीकृष्णाची सतत आठवण येते. ‘त्याला बोलावल्यावर तो येतो आणि मला ‘हे कर. ते कर. इकडे जा. तिकडे जा’, असे सांगतो’, असे ती शाळेतून आल्यावर मला सांगते. 
४ ओ ३. कृष्णाच्या नामात मग्न होणे : सायंकाळी ‘शुभं करोती’ म्हटल्यावर ती श्रीकृष्णाचा नामजप करण्यात एवढी मग्न होऊन जाते की, तिला वेळेचे भानच रहात नाही.
४ ओ ४. ‘एल्सा’ नव्हे, तर श्रीकृष्णच खरा होता, आहे आणि रहाणार’, असे ठामपणे सांगणे : एकदा आम्ही तिच्या मैत्रिणीकडे गेलो होतो. त्या खेळत असतांना तिची मैत्रीण म्हणाली, ‘‘फ्रोजन एल्सा’ हे व्यक्तित्व खरे आहे.’’ (डिस्नीचे ‘फ्रोजन एल्सा’ नावाचे एक प्रसिद्ध व्यक्तित्व आहे. ‘ते खरे आहे’, अशी तिथल्या मुलांची समजूत आहे.) तेव्हा मृदुला लगेच म्हणाली, ‘‘एल्सा काही खरा नाही. श्रीकृष्णच खरा होता, आहे आणि रहाणार !’’ तिच्या या वक्तव्यावर तिची मैत्रीण रडायला लागली. तेव्हा त्या मैत्रिणीची आई म्हणाली, ‘‘एल्सा’पण खरा आहे आणि श्रीकृष्णही खरा आहे.’’ तेव्हा मृदुला त्यांनाही म्हणाली, ‘‘नाही काकू. केवळ श्रीकृष्णच खरा आहे.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘हिला श्रीकृष्णाचे पुष्कळ वेड आहे’, असे वाटते !’’
४ औ. प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव
४ औ १. तिला प.पू. डॉक्टरांविषयीचा एक ग्रंथ सर्वाधिक आवडतो. ती त्यातील चित्रे पहाते आणि मला जिज्ञासेने प्रश्‍न विचारते. 
४ औ २. सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचा वापर करतांना ‘ती प.पू. गुरुदेवांनी आपल्यासाठी पाठवली आहेत’, असा तिच्यात कृतज्ञताभाव जाणवतो. 
४ अं. संतांप्रतीचा भाव
४ अं १. संतांविषयी अनेक प्रश्‍न विचारणे आणि त्यांना भेटायला आतुर होणे : ‘संत कसे आहेत ? ते श्रीकृष्णाशी कसे बोलतात ? तो त्यांना कसा भेटतो ? मला संतांना भेटायला जायचे आहे. ‘ते कसे दिसतात ? कसे बोलतात ?’, हे मला पहायचे आहे’, असे ती सतत म्हणत असते. ‘आपण पुण्याला गेलो की, लगेच बाबांना घेऊन संतांना भेटू’, असे ती म्हणते. आता ‘ती भारतात नेहमीसाठी जाण्यासाठी आणि संतांना भेटण्यासाठी आतुर झाली आहे’, असे जाणवते.
४ अं २. ‘संतांकडे केवळ पहात रहाणार’, असे सांगणे : तिला विचारले, ‘‘तू संतांशी काय बोलणार ?’’ तर ती म्हणाली, ‘‘मी नाही बोलणार. तू त्यांच्याशी आणि तेे तुझ्याशी जे बोलतील, ते मी ऐकणार आणि त्यांना केवळ पहात रहाणार !’’
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
     ‘हे श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेमुळे हे लिखाण पूर्ण करू शकले, याविषयी मी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. तूच मृदुलाला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घे आणि त्यासाठी तिच्यावर जे संस्कार माझ्याकडून घडवणे अपेक्षित आहे, ते तूच मला शिकव’, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’ 
- सौ. चैताली विजय झोडे (मृदुलाची आई), स्वित्झर्लंड (४.२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn