Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. गुरुमाऊलींना केलेले आत्मनिवेदन !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
गुरुमाऊली, तुमच्या कोमल चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे !
साधना करण्यासाठी देवाने मला जन्म दिला ।
गुरुमाऊली, तुम्ही मला साधक आई-बाबा दिले ।
आणि त्यांंच्या माध्यमातून प्रेमाने सांभाळले ।
लहानपणापासून साधकांच्या सत्संगात ठेवले ।
कसलीच उणीव भासू न देता मला सांभाळले । माझ्यात साधना करण्याची ओढ निर्माण केली आणि ती टिकवूनही ठेवली ।
गुरुमाऊली, मायेतील शिक्षणातून सोडवून मला अध्यात्मातील शिक्षण देत आहात ।
तुम्हीच माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन व्हावे, यासाठी तळमळत आहात ।
तुम्ही मला भूलोकीच्या वैकुंठात, म्हणजेच रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी देत आहात ।
तुम्हीच मला भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा कशी करायची, हे शिकवत आहात ।
तुम्ही सूक्ष्मातून दर्शन देऊन मला बर्‍याच गोष्टी सांगता आणि शिकवता ।
माझ्याकडून अनेक चुका झाल्या, तरीही संत, साधक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून चुका सुधारण्याची अन् स्वतःत पालट करण्याची संधी देत आहात ।
गुरुमाऊली, तुम्हीच मला दिलेल्या या संधीचे माझ्याकडून सोने करवून घ्या ।
मला आपल्या चरणी विलीन करून घ्या !
     तुमच्यासारखी विष्णुस्वरूप गुरुमाऊली आम्हाला मिळाली, हे आमचे अहोभाग्यच आहे, यासाठी आम्ही तुमच्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’
- कु. योगिनी आफळे (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn