Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे, तर कॉ. पानसरे हत्येचे प्रकरण न्यायप्रविष्ट !

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
      नागपूर - डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला असून त्याचे अन्वेेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) वर्ग केले आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील २ आरोपींवर गुन्हा प्रविष्ट केला असून त्यांच्यावर दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. पानसरे हत्या प्रकरणी गुन्हा न्यायप्रविष्ट असून त्यातील काही फरार आरोपींचे पुढील अन्वेषण चालू आहे, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विधान परिषदेचे आमदार संजय दत्त आणि रामहरी रूपनवर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. या प्रकरणी हत्येचे अन्वेषण पूर्ण झाले आहे का ? त्यात काय आढळून आले ? त्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे आणि तपासाची सद्यस्थिती काय आहे ? असे लेखी प्रश्‍न विचारण्यात आले होते.
     १४ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी केली. त्या वेळी विरोधकांचा गोंधळ आणि सभागृह स्थगिती यांमुळे सभापतींनी प्रश्‍नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे वरील लेखी उत्तराची चर्चा सभागृहात झाली नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn