Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एकटा पडलेला बंगाल !

संपादकीय
     बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत कि पाकमधील एका राज्याच्या ?, असा प्रश्‍न हल्ली भारतियांना वारंवार पडतांना दिसतो. याला कारणीभूत आहे त्यांचे वर्तन. बंगालमध्ये टोलनाक्यांवर भारतीय सैनिकांची नियुक्ती केल्यावर त्यांनी ‘बंगालमध्ये सैन्य घुसवून केंद्रशासन तेथील तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे’, असा थयथयाट केला. हा सैन्य सरावाचा एक भाग असून त्याला बंगाल शासन आणि प्रशासन यांनी अनुमती दिल्याचे समोर आल्यावर त्या तोंडघशी पडल्या. सध्या त्यांना स्वतःचा जीव धोक्यात असल्याचे भासू लागले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या हवाईप्रवास करत असलेल्या विमानाचे इंधन संपल्याची गोष्ट समोर आल्यावर ते विमानतळावर उतरवण्यात आले. त्यांच्या सहकार्‍यांनी मात्र बॅनर्जी यांना मारण्याचा कट रचल्याचा गाजावाजा करायला आरंभ केला. वास्तविक ‘बॅनर्जी यांना कशाची धास्ती वाटते’, हेच लक्षात येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला त्या विरोध करतात. त्याला कारणेही तशीच आहेत. बंगालमध्ये त्या धर्मांधांच्या मतांवर निवडून आल्या आहेत. एवढेच काय, त्यांच्या पक्षातील धर्मांध नेते-कार्यकर्तेही जिहाद्यांना आश्रय देतांना दिसतात. काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये बॉम्बस्फोटांची शृंखला चालू झाली. त्या वेळी त्याच्या अन्वेषणासाठी गेलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांना बंगाल शासन-प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नाही. यांतील काही बॉम्ब तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घरात फुटले होते, हे त्यामागील खरे कारण ! ‘अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी सखोल चौकशी करून पक्ष आणि जिहादी यांचे संबंध उघड केल्यास पक्षाची अब्रू धुळीला मिळेल’, अशी भीती त्यांना वाटत होती. भारतीय सैन्याने जर बंगालमध्ये ठाण मांडले, तर त्यांना ‘प्रिय’ असणार्‍या जिहाद्यांना बंगालमध्ये देशविघातक कारवाया करण्यास अडचण भासेल ! ‘भारत-बांगलादेश सीमारेषेवर असलेले जिहाद्यांचे तळ उद्ध्वस्त वगैरे करण्याचे भारतीय सैन्याचे नियोजन असल्यास बॅनर्जी यांना प्राणांहून प्रिय असणार्‍या जिहाद्यांचे कसे होईल ?’, या भीतीनेच बहुदा बॅनर्जी यांना पछाडले असावे ! त्यामुळेच बंगालच्या भूमीतील भारतीय सैन्याचा वावर त्यांना खटकू लागला. धर्मांध आणि जिहादी यांना सुख-समृद्धी लाभावी, यासाठी ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये स्वतःची एकाधिकारशाही हवी आहे. त्याच्या आड येणार्‍या प्रत्येक सूत्राला त्या विरोध करतांना दिसत आहेत. या विरोधाला देशद्रोहाची, हिंदुद्वेषाची किनार आहे. एकेकाळी इंग्रजांच्या उरात धडकी भरवणार्‍या क्रांतीकारकांचे माहेरघर असणारे बंगाल आज जिहाद्यांचे माहेरघर बनले आहे, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. बंगालला एकटे पाडून ते जिहाद्यांच्या घशात घालू पहाणार्‍या ममता बॅनर्जी यांना रोखणे आवश्यक आहे. अन्यथा ‘बंगाल हे भारताचे राज्य होते’, ही गोष्ट इतिहासजमा होईल !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn