Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डीजेला अनुमती; मात्र वातावरण शुद्ध करणार्‍या सुरांवर बंधने !

मध्यरात्रीनंतर नागरिकांना मनःस्ताप देत पार पडलेल्या
पैगंबर मिरवणुकीविषयी सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांची भावना
    पुणे, १५ डिसेंबर - सूर हे कलाकारांचे दैवत आहे. आम्ही सुरांची पूजा मांडतांना सरकार आम्हाला आडवे येते. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आठवतो; मग रात्री-अपरात्री होणार्‍या डिस्कोचा दणदणाट कसा दिसत नाही ? ध्वनीक्षेपकांच्या भिंतींना अनुमती असते; मात्र ज्या सुरांनी पंचक्रोशीतील वातावरणाची शुद्धी होते, त्यांना मात्र नियम लावले जातात. आम्ही नियमांचे पालन करतो; म्हणूनच सॉफ्ट टार्गेट होतो, अशी भावना सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. मध्यरात्रीनंतरही डीजेच्या दणदणाटात चालू असलेल्या पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत श्री. देशपांडे यांनी त्यांना झालेला मनःस्ताप फेसबूकद्वारे व्यक्त केला.
    या वेळी त्यांनी धर्मांधांना मिळणार्‍या विशेष सवलतीकडे आणि चांगल्या कार्यक्रमांवर आणल्या जाणार्‍या बंधनांवर मार्मिक टिपणी केली. मध्यरात्रीनंतर कर्णकर्कश आवाजाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही पोलिसांकडून दूरभाषच उचलला गेला नाही, असेही त्यांनी सांगितले (खरे तर चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन आणि वाईट गोष्टींचे दमन अशी शासनाची रीत असायला हवी. लोकशाही पद्धतीत मात्र सर्वांना समान नियम लावले जातात आणि प्रत्यक्षात नियमांच्या अंमलबजावणीत पक्षपात होतो. त्यामुळेच नागरिकांमध्ये उद्विग्नतेची भावना निर्माण होत आहे. राज्यकर्ते आणि पोलीस-प्रशासन यांमधील अधिकारी याची नोंद घेतील का ? - संपादक)


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn