Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मराठी शाळांचे प्रश्‍न मराठी साहित्य संमेलनात मांडा !

 • अशी मागणी करावी लागणे हेच मायमराठीसाठी लज्जास्पद आहे !
 • शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे मागणी
        मुंबई, २२ डिसेंबर - इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आकर्षणामुळे अनेक पालक त्यांच्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठी शाळा वाचवण्याविषयीचा ठराव डोंबिवली येथे होणार्‍या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडावा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे श्री. अनिल बोरनारे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे केली आहे.
डोंबिवली येथे होणार्‍या साहित्य 
संमेलनात संमत होणार असलेले ठराव
 • शाळांचे अस्तित्व टिकवावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी.
 • संवर्धनासाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे.
 • जिल्हा आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांसाठी बालसाहित्य संमलने भरवावीत.
 • शाळांना थेट १०० प्रतिशत अनुदान द्यावे.
 • तिथे ग्रंथालय आणि ग्रंथालय तिथे पूर्णवेळ ग्रंथपालांची नियुक्ती करावी.
 • वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी, पुस्तके खरेदीसाठी शाळांना विशेष निधी संमत करावा.
 • जिल्ह्यात शिक्षकांसाठी शिक्षक साहित्य संमेलन भरवावे.
 • शाळांना सर्व इयत्तांची भाषा अभ्यासक्रमाची संदर्भ पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
 • शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा निधी २ लक्ष रुपये इतका करावा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn