Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय !

मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील दंगलीचे प्रकरण !
     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांनी १६ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आणि मलकापूर येथील नागरिकांनाही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये, तसेच त्या निमित्ताने कोणीही जाहिरात, फलक लावू नये आणि कोणतेही कार्यक्रम ठेवू नयेत, असे आवाहन केलेे. (दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेणारे भाजपचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांचे अभिनंदन ! - संपादक)
वर्तमानपत्रातून केलेल्या आवाहनात श्री. संचेती यांनी म्हटले आहे की,
१. यापूर्वी अनेकदा समाजकंटकांनी मलकापूर शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा तो प्रयत्न मी वेळोवेळी हाणून पाडला. मी आमदार होण्यापूर्वी संवेदनशील अशी नोंद असलेल्या मलकापूर शहराला मी कधीही गालबोट लागू दिले नाही. आज मात्र काही समाजकंटकांमुळे मलकापूर शहर पुन्हा एकदा धगधगत आहे. शहरातील परिस्थिती पहाता मी लोकप्रतिनिधी तथा मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून वाढदिवस साजरा करणे हे माझ्या मनाला पटणारे नाही. आज संपूर्ण मलकापूर शहरात सद्भावपूर्ण वातावरण नाही. अशा वातावरणात माझ्या चाहत्यांकडून, मित्रांकडून माझा वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही.
२. मलकापूरची दंगल प्रशासन रोखू शकले नही. त्याविषयी मी आधीच प्रशासनाला जाणीव करून दिली होती. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत मीसुद्धा घायाळ झालो आहे. आज या संपूर्ण प्रकारामुळे मलकापूर शहरात अशांतता आहे. अनेक तरुण भीतीपोटी भयभीत आहेत. ही परिस्थिती आता पूर्ववत् आणण्याच्या दृष्टीकोनातून लोकांची साथ हवी आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn