Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इंडोनेशियात भूकंपामुळे ८४ सहस्र लोक बेघर !

  • भारतात पुढे अशाच आपत्कालाच्या घटना घडल्यावर अशी स्थिती येऊ शकते, त्या वेळी सरकार आणि प्रशासन साहाय्य करील, याची निश्‍चिती नाही. हे लक्षात घेऊन हिंदूंनी आतापासून साधनेला प्रारंभ करावा. त्यामुळे अशा काळात देव त्यांचे रक्षण करू शकेल !
    जकार्ता - काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाला बसलेल्या ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे ८४ सहस्र लोक बेघर झाले आहेत. या भूकंपात १०० लोकांचा बळी गेला आहे. अनेक लोक घायाळ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. हिंदी महासागरात वर्ष २००४ मध्ये आलेल्या सुनामीनंतर या भागातील ही सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. या भूकंपात अनेक इमारती, औद्योगिक आस्थापनांच्या इमारती, मशिदी पडल्या आहेत.     या भूकंपानंतर अनेक सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक लोक साहाय्य छावणीत रहाण्यास प्राधान्य देत असून ज्या इमारती चांगल्या स्थितीत आहेत, त्या ओसाड पडल्या आहेत. काही शिबिरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. अनेक विहिरी कोरड्या पडल्यानेही नागरिकांचे पाण्याचे हाल होत आहेत. अन्न, कपडे आणि स्वच्छतेच्या सामानाचा अभाव असून साहाय्यकार्य अपुरे पडत आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाला ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn