Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सातारा येथेही सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

सनबर्न फेस्टिवल रहित करावा यासाठी
आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ महिला कार्यकर्त्या

         सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) - गेली काही वर्षे गोवा येथे होणारे सनबर्न फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तरुण पिढीला व्यसनाधीन करणारा हा कार्यक्रम त्वरित रहित करावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संंघटनांच्या वतीने गोलबाग, राजवाडा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलक रणरागिणींनी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात भारतीय जनता पक्ष, दुर्गावाहिनी, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा, शिवसेना, सनातन संस्था यांसह विविध सामाजिक संघटनांच्या महिला-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
अवैध उत्खनन करून तेथील शेतकर्‍यांना धमक्या
देऊन आयोजित केलेला सनबर्न फेस्टिव्हल तात्काळ
रहित करावा ! - सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा
         हा फेस्टिव्हल जेथे होत आहे, तेथे आयोजकांकडून स्थानिक शेतकर्‍यांची भूमी विनाअनुमती वापरणे, अवैध उत्खनन करणे, या संदर्भात तक्रार करणार्‍यांना स्थानिकांना धमक्या देणे, असे गंभीर प्रकारही होत आहेत. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाधीन करणारा हा कार्यक्रम त्वरीत रहित करावा, अशी मागणी या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांनी केली.
         भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष सौ. निर्मला सांगलीकर, भाजपच्या नगरसेविका सौ. सिद्धी पवार, भाजपच्या नगरसेविका सौ. प्राची शहाणे, दुर्गावाहिनी शाखेच्या सौ. आशा इनामदार, रणरागिणी शाखेच्या सौ. विद्या कदम यांनी या प्रसंगी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध प्रदर्शित केला. सनातन संस्थेच्या सौ. सविता जगताप यांनी ३१ डिसेंबर साजरा करू नये, याविषयी प्रबोधन केले.
         सनबर्न फेस्टिव्हल रहित करावा आणि ३१ डिसेंबर साजरा करू नये, यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या वेळी आंदोलकांनी केलेल्या मागण्या...
१. शेतकर्‍यांची अनुमती न घेता सनबर्नचे आयोजन करणार्‍या आयोजकांवर अवैध भूमी बळकावल्या प्रकरणात गुन्हा प्रविष्ट करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.
२. गेल्या दोन मासांपासून तलाठी, जिल्हाधिकारी, वनसंरक्षक यांना सनबर्नच्या संदर्भात तक्रार करूनही पुढील कारवाई न करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी.
३. भारतीय संस्कृतीशी कोणताही संबंध नसलेल्या आणि सर्वच प्रकारच्या अवैध कृती करून आयोजित केलेल्या सनबर्न फेस्टिव्हलची अनुमती तात्काळ रहित करावी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn