Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सहनशील, तसेच देवाची आणि सेवा करण्याची आवड असणारी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. आरुषी अमित सेलूकर (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन 
धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. आरुषी अमित सेलूकर एक दैवी बालक आहे !
चि. आरुषी सेलूकर
      (‘गेल्या वर्षी पुणे येथील चि. आरुषीची पातळी ६१ टक्के होती.’ - संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. जिज्ञासूवृत्ती
     ‘मी चि. आरुषीला ‘शांताकारम् भुजगशयनम्..’ हा श्‍लोक म्हणायला शिकवला. त्या वेळी तिने लगेच त्या श्‍लोकाचा अर्थ विचारून घेतला. 
२. सहनशीलता
     एकदा तिला गाडीचा ‘सायलेंसर’ लागून भाजले. तेव्हा तिने दिवसभर त्याविषयी कुणालाही सांगितले नाही. संध्याकाळी तिच्या पायावर जखम दिसली. त्या वेळी त्यासंबंधी विचारल्यावर तिने पाय भाजल्याचे सांगितले.
३. राष्ट्रप्रेम 
अ. एकदा मी आरुषीला माझ्यासमवेत शाळेत घेऊन गेले आणि तेथील कार्यालयात एक काम करत होते. तेव्हा त्या ठिकाणी तिला एका कोपर्‍यात राष्ट्रध्वज खाली पडलेला दिसला. तिने तो उचलून माझ्याजवळ दिला आणि ती म्हणाली, ‘‘हा आपला झेंडा आहे ना, तो नीट ठेव.’’
आ. आरुषीने सनातनच्या संस्कार वहीवर ‘हिंदूंंची तेजस्वी झांशीची राणी’ हिचे चित्र पाहिले. त्यानंतर तिने स्वतःच शाळेतील वेशभूषा स्पर्धेत ‘झाशीच्या राणी’ची वेशभूषा करायचे ठरवले. तिने स्वतःहून सात्त्विक पोशाखाची निवड केली आणि तिने ती वेशभूषा सादर केली. 
४. देवाची आवड असणे 
अ. आरुषी प्रतिदिन देवतांचे श्‍लोक आणि स्तोत्र म्हणते अन् नामजप करते. तसेच प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते. 
आ. तिला जेवतांना श्रीकृष्ण आणि भक्त प्रल्हाद यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात. 
इ. एकदा तिला मारुतीच्या मंदिरात नेले असता तेथे प्रार्थना करून ‘मनोजवं मारुततुल्य वेगं...’ हा श्रीरामरक्षास्तोत्रातील श्‍लोक तिला न शिकवताही तिने म्हटला. 
५. श्रीकृष्णावरील प्रेम
     एकदा माझ्यासमवेत बाहेर गेल्यावर आरुषीने पिण्याच्या पाण्याची बाटली भरली. नंतर एका झाडाखाली बसलेल्या एका आजोबांनी तिच्याकडे पाण्याची बाटली मागितली. तेव्हा क्षणभर ती तिथेच थांबली. तेव्हा आजोबा तिला म्हणाले, ‘‘पाण्याला ‘नाही’ म्हणू नये. श्रीकृष्ण तुझ्याकडे पाणी मागत आहे.’’ त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता तिने पाण्याची बाटली त्या आजोबांना दिली. 
६. सेवेची आवड असणे
     ती नियमित तिच्या बाबांसमवेत सनातन प्रभातच्या अंकांचे वितरण करण्यास जाते आणि माझ्यासमवेत फलक-लेखनाच्या सेवेला येते. सेवेला गेल्यावर ती नामजपही करते.
७. स्वभावदोष 
अ. तिच्यात ऐकण्याची वृत्ती अल्प आहे. 
आ. तिच्यात अव्यवस्थितपणा आहे.’ 
- सौ. धनश्री सेलूकर (चि. आरुषीची आई), पुणे (२३.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn