Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदूंवरील आघात आणि साधना इत्यादींविषयी केलेल्या जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओडिशा राज्याचे नोव्हेंबर २०१६ मधील प्रसारकार्य 
१. प्रवचने
१ अ. कटक येथे एस्.एस्.आर.एफ्.च्या (‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशन’ या आध्यात्मिक संस्थेच्या) जिज्ञासूंसाठी ‘अध्यात्मशास्त्रातील संशोधन आणि साधनेचे मूलभूत सिद्धांत’ या विषयावर प्रवचन : ‘९.११.२०१६ या दिवशी कटक येथील एस्.एस्.आर.एफ्.च्या जिज्ञासू श्रीमती हेमप्रभा भुईयान यांच्या घरी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. प्रवचनाला बुद्ध संप्रदायानुसार साधना करणार्‍या चार हिंदु महिला आणि श्रीमती हेमप्रभा यांच्या घरातील दोघीजणी उपस्थित होत्या. त्या वेळी संस्थेने केलेले अध्यात्मशास्त्रातील संशोधन आणि साधनेचे मूलभूत सिद्धांत यांची माहिती देण्यात आली. बुद्ध संप्रदायानुसार साधना करत असूनही त्यांनी ही माहिती समजून घेण्याची जिज्ञासा दाखवली. त्या महिला म्हणाल्या, ‘‘अशी शास्त्रीय माहिती देण्यासाठी तुम्ही अवश्य या. आम्ही वेळ काढून उपस्थित राहू.’’
     सत्संग झाल्यानंतर श्रीमती हेमप्रभा आणि त्यांची मुलगी कु. मधुश्री यांनी रामनाथी आश्रम आणि साधना यांविषयी माहिती जाणून घेण्यात विशेष रूची दाखवली. त्या दोघीही रामनाथी आश्रमात ५ दिवस झालेल्या कार्यशाळेत उपस्थित होत्या. त्या दोघीही रामनाथी आश्रम आणि कार्यशाळेत मिळालेली माहिती यांच्यामुळे प्रभावित झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘डिसेंबर २०१६ पासून घरी सत्संगाचे आयोजन नियमितपणे करूया.’’
१ आ. वेदव्यास, राऊरकेला येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन : २०.११.२०१६ या दिवशी वेदव्यास, राऊरकेला येथील श्री. प्रमोद सिंह यांनी त्यांच्या घरी ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले. या प्रवचनास ९ जण उपस्थित होते. या वेळी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावरील ध्वनीचित्रचकतीही दाखवण्यात आली. ‘पुढच्या वेळी आणखी जिज्ञासूंना बोलावू’, असे श्री. सिंह यांनी सांगितले.
१ इ. राऊरकेला येथील गांधी रोड भागात धर्माभिमानी अधिवक्ता विभूती भूषण पलई आणि सौ. आशा शर्मा यांच्या पुढाकाराने ‘धर्मावर होणारे आघात, परिणाम आणि धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन : राऊरकेला येथे गांधी रोड भागात धर्माभिमानी अधिवक्ता विभूती भूषण पलई आणि सौ. आशा शर्मा यांनी ‘धर्मावर होणारे आघात, परिणाम आणि धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले. श्री. प्रकाश मालोंडकर यांनी लव्ह जिहाद, धर्मांतरण, उत्सव, धार्मिक विधी आदी माध्यमातून धर्मावर होणार्‍या विविध आघातांची माहिती देऊन धर्माचरणाचे महत्त्व विषद केले. या वेळी ३० महिला उपस्थित होत्या. सौ. आशा शर्मा या ‘त्रिवेणी महिला समिती’च्या संस्थापक अध्यक्षा असून त्यांनी ‘अशा प्रकारच्या प्रवचनाचे आयोजन त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य महिला मंडळांच्या ठिकाणीही करूया’, असे आश्‍वासन दिले.
२. मान्यवरांना संपर्क
२ अ. हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. श्यामसुंदर पोद्दार यांनी रामनाथी आश्रमाला भेट देण्याची उत्सुकता दाखवणे : हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. श्यामसुंदर पोद्दार यांना कटकमध्ये संपर्क करण्यात आला. त्यांचे गोरक्षण आणि धर्मरक्षण इत्यादी क्षेत्रात कार्य आहे. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले, संस्थेचे कार्य आणि रामनाथी आश्रम यांच्याविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी रामनाथी आश्रमाला भेट देण्याची उत्सुकता दाखवली.
३. बडबिल येथील व्यावसायिक श्री. राजेंद्र पसारी यांचा सात्त्विक उत्पादने वितरणात सक्रीय सहभाग
    बडबिल येथील व्यावसायिक श्री. राजेंद्र पसारी यांनी मागील मासात (महिन्यात) सेवाकेंद्रास भेट देऊन ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि देवतांची सात्त्विक चित्रे घेतली होती. या मासात श्री. पसारी हे त्यांना आलेली अनुभूती सांगण्यासाठी राऊरकेला येथील सेवाकेंद्रात आले. त्यांनी सांगितले, ‘‘मी पूजेत अष्टगंध वापरतो. मी श्री साईबाबांच्या पादुकांनाही भक्तीभावाने नियमितपणे अष्टगंध लावतो. माझ्या परिचयाच्या एका संतांमध्ये श्री साईबाबांचा अविष्कार होतो. मी त्या संतांच्या दर्शनासाठी गेलो असता त्या संतांनी ‘तुम्ही अर्पण करत असलेला सुगंध मला पोचतो’, असे सांगितले. तेव्हा मला साईपादुकांना लावत असलेल्या अष्टगंधाची आठवण येऊन भावजागृती झाली.’’
   श्री. पसारी यांनी उदबत्ती, अष्टगंध आणि कापूर आदी साहित्य मित्र आणि नातेवाइक यांना भेट दिले. ते म्हणाले, ‘‘डिसेंबर २०१६ मध्ये बडबिल येथेे प्रवचनाचे आयोजन करूया.’’
- श्री. प्रकाश मालोंडकर, राऊरकेला, ओडिशा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn