Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पंढरपूरमधील अनधिकृत मटण दुकानांच्या विरोधातील छावाच्या आंदोलनाला वारकर्‍यांसह अनेकांचा पाठिंबा !

        पंढरपूर - ही आध्यात्मिक नगरी असून येथे वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी हे गळ्यात तुळशीची माळा परिधान करून मांसाहाराचा संपूर्पपणे परित्याग करणारे असतात. असे असतांना शहराच्या विविध भागांत रस्त्यावरच अनधिकृतरित्या दर्शनीय भागात मटणविक्री केली जाते. वारकर्‍यांच्या भावना दुखावतील असे कृत्य घडू नये, ही छावाची भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेला समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज (संघटना), ह.भ.प. श्री संत बद्रीनाथ महाराज (संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट), विश्‍व वारकरी सेना, विश्‍व संत पालखी सोहळा, वारकरी सांप्रदाय पाईक संघ, शिवसंग्राम संघटना आदींसह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. शहरातील अनेक भागांत अनधिकृतरित्या उघडपणे चालणारी मटणविक्रीची दुकाने बंद करावीत, अशी एकमुखाने मागणी आता जोर धरत आहे.
        काही दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत मांस आणि मटण विक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने करून याविरुद्ध एल्गार पुकारला होता. पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कारवाई करून शहरातील अनधिकृत ३९ दुकाने बंद केली; परंतु शहरातील काही संघटनांनी छावाने केलेली ही मागणी आणि आंदोलन यांविषयी नागरिकांची आणि मुसलमानांची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर छावाच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील मुसलमानांना वस्तूस्थिती सांगून त्यांची भूमिका स्पष्ट केली.
छावाची भूमिका
        मटण मार्केटला शहराबाहेर कुठेतरी पर्यायी जागा द्यावी, जेणेकरून हवेशीर जागा मिळेल, जिथे स्वच्छता राहील आणि स्वच्छ पदार्थ मिळतील. शहरात जे काही अनधिकृत मटणविक्रीचे स्टॉल आहेत, ते बंद व्हावेत, ही छावाची मागणी असून नगरपरिषदेच्या प्रशासनाने त्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn